
E-Shram Card: केंद्र सरकार देशातील कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत असतात. गरीब वर्गाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असून त्यासाठी ते ई-श्रम कार्ड योजना राबवत आहे.
या योजनेंतर्गत असंघटित क्षेत्राशी संबंधित कामगार स्वतःची नोंदणी करू शकतात. भारत सरकारने ई-लेबर पोर्टल तयार केले आहे. डिसेंबर 2022 मध्ये या पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या कामगारांची एकूण संख्या 28 कोटींच्या पुढे गेली होती.
ई-लेबर पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर कामगारांना सरकारच्या योजनांचा लाभ घेता येतो. पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी कामगारांकडे आधार कार्ड (Aadhar Card) असणे आवश्यक आहे.
याशिवाय सक्रिय मोबाईल (Mobile) क्रमांकाशी आधार लिंक करणे आवश्यक आहे. याशिवाय बँक अकाउंट देखील आवश्यक आहे. ज्यांच्याकडे आधार लिंक मोबाईल नंबर नसेल तर ते जवळच्या CSC केंद्राशी संपर्क साधू शकतात. बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करता येते. तुमचा मोबाईल नंबर देखील आधारमध्ये अपडेट केला जाईल.
सरकार विमा देत आहे
सध्या सरकार ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांना 2 लाख रुपयांचा अपघाती विमा देत आहे. ई-लेबर पोर्टलमध्ये सामील होणाऱ्या कामगारांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतचे विमा लाभ मिळतात.
यामध्ये विम्यासाठी प्रीमियम भरण्याची गरज नाही. एखाद्या मजुराचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा तो पूर्णपणे अपंग झाल्यास दोन लाख रुपयांची विमा रक्कम मिळते. जर एखादा कामगार अंशतः अपंग झाला तर त्याला एक लाख रुपयांचा विमा मिळतो.
कोण नोंदणी करू शकत नाही
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने असंघटित क्षेत्रातील 38 कोटी कामगारांना जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जर कोणी सरकारच्या पेन्शन योजनेचा लाभ घेत असेल तर ती व्यक्ती ई-श्रम कार्ड योजनेत सहभागी होऊ शकत नाही.
त्याच वेळी, पीएम किसान योजनेचे (PM Kisan Yojna) लाभार्थी देखील ई-श्रम योजनेअंतर्गत पैसे (Money) घेऊ शकत नाहीत. कोणताही कामगार जो असंघटित आहे आणि 16 ते 59 वयोगटातील आहे तो या योजनेत स्वतःची नोंदणी करू शकतो.
ई-लेबर कार्डसाठी ऑनलाइन नोंदणी कशी करावी
सर्वात पहिले अधिकृत वेबसाइटवर जावे.
त्यानंतर 'ई-श्रम' वर रजिस्ट्रेशन' वर क्लिक करावे.
यानंतर तुम्हाला आधार लिंक केलेला मोबाईल नंबर टाकून कॅप्चा टाकावा लागेल.
त्यानंतर Send OTP वर क्लिक करावे.
यानंतर OTP टाकावा आणि त्यानंतर ई-श्रमसाठी रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल.
त्यानंतर तुम्हाला तुमचे वैयक्तिक, शैक्षणिक आणि बँक डिटेल टाकावे लागेल.
मग तुमची नोंदणी पूर्ण होईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.