"अर्थव्यवस्थेत 7.7 टक्क्यांनी घसरण होण्याचा अंदाज"

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 10 जानेवारी 2021

एनएसओ ने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शेतीवगळता अन्य क्षेत्रातील 2020-2021 या आर्थिक वर्षात 7.7% घसरण होण्याची शक्यता वर्तवली आहे

 मुंबई कोरोनाचा वाढता प्रसार आणि सक्तीच्या टाळीबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची स्वातंत्र्योत्तर चार दशकातील सर्वात मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.एनएसओ ने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शेतीवगळता अन्य क्षेत्रातील 2020-2021 या आर्थिक वर्षात 7.7% घसरण होण्याची शक्यता वर्तवली आहे.2019-20 या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेत 4.4% नी वाढ झाली होती.

.संसदेत अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी पहिल्या आगाऊ अंदाजानुसार देशाच्या चालू आर्थिक वर्षात जीडीपीमध्ये 7.7%घसरण होईल असं एनएसओ जाहीर केलं. स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात मोठी तीव्र स्वरुपाचे आकुंचन ठरणार असल्याचे एनएसओने संकलीत केलेल्या आकडेवारीवरुन निदर्शनात येत आहे.चालू आर्थिक वर्षातील एप्रील- जूनच्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची उणे 23.9 टक्क्यांनी मोठी घसरण झाली होती.रिझर्व्ह बॅंकसहं अनेक विश्लेषकांनी अर्थव्यवस्थेत तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीमध्ये सकारात्मक वाढ होईल असं भाकित केलं आहे.

तर दुसरीकडे मात्र एनएसओनं संपूर्ण आर्थिक वर्षात पहिल्या दोन तिमाहीत अर्थव्यवस्थेत मोठी घसरणीचा प्रभाव असल्याचं सांगितलं.चालू आर्थिक वर्षात निर्मिती क्षेत्रात 9.4% नी घसरण होण्याची शक्यता वर्तवली आहे.त्याचबरोबरीने खाणकाम,व्यापार, वाहतूक संचार,या क्षेत्रात तीव्रतेची घसरण अनुभवास येईल.केवळ कृषी क्षेत्रात काही थोडी सकारात्मकता पाहायला मिळेलं.कृषी क्षेत्रानं 3.4% वाढ दर्शवली आहे. मात्र  मागील आर्थिक वर्षातील 4%च्या तुलनेनं तोकडीचं वाढ झाल्याचं दिसते.

संबंधित बातम्या