''या'' इलेक्ट्रिक स्कूटरने तुम्ही करु शकता 200 किलोमीटरचा प्रवास

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 27 मे 2021

इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक अश्या स्कूटर तयार करीत आहेत ज्या बॅटरी स्वॅपिंगची सेवा देतात.

भारतात इलेक्ट्रिक स्कूटर (Indian Electric Scooter) न वापरण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची बॅटरीची क्षमता. वास्तविक इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज फारशी नसते, अशा परिस्थितीत जेव्हा आपण लांब प्रवासात जाता तेव्हा तुमची गाडी मधेच थांबू शकते. पुन्हा बॅटरी चार्ज करायला 5 ते 6 तास देखील लागतात. अशा समस्येसाठी, इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक अश्या स्कूटर तयार करीत आहेत ज्या बॅटरी स्वॅपिंगची सेवा देतात.  ज्याच्या मदतीने आपण इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज दुप्पट करू शकतो. (With this electric scooter you can travel 200 kilometers)

बॅटरी स्वॅपिंग म्हणजे काय

बॅटरी स्वॅपिंग सेवेमध्ये आपण आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची डिस्चार्ज बॅटरी चार्ज केलेल्या बॅटरीसह बदलू शकता. ज्या स्कूटरमध्ये हे फिचर टाकले जाते त्या गाडीची रेंज आपोआप वाढेल. खास गोष्ट म्हणजे ही सुविधा आपल्याला इलेक्ट्रिक स्कूटरद्वारे लांब प्रवासास जाण्याची सुविधा देते. आज आम्ही तुम्हाला अशा इलेक्ट्रिक स्कूटरविषयी सांगणार आहोत ज्या लवकरच भारतात लॉन्च केल्या जाऊ शकतात.

Flying Car: हवेत उडणारी कार कधी येईल, किंमत किती असेल? जाणून घ्या

गोगोरो विवा इलेक्ट्रिक स्कूटर

गोगोरो व्हिवा इलेक्ट्रिक स्कूटर डिटेचेबल बॅटरीसह येते ज्याच्या मदतीने स्कुटरची रेंज वाढविली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर 85 किलोमीटरपर्यंत चालू शकते. ही इलेक्ट्रिक स्कूटर 30 किमी प्रतितास वेगाने पळते. यात 3  केडब्ल्यू (KW) मोटर आहे, जी 115 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. जर आपण या स्कूटरच्या डिझाइनबद्दल बोलत असाल तर ते अगदी सोपे ठेवले आहे.

BSNL: दररोज 3 जीबी डेटा, फ्री कॉलिंग, 90 दिवसांची एक्स्ट्रा वैलिडिटी ऑफर

ओला इलेक्ट्रिक स्कूटर

ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये व्हिवा इलेक्ट्रिक स्कूटर सारखी सुलभ किंवा स्वॅप करण्यायोग्य बॅटरी देखील आहे.  जी डिस्चार्ज झाल्यावर आपण दुसर्‍या चार्ज केलेल्या बॅटरीला त्याच्या जागी बदलून स्कूटर अधिक लांब चालवू शकतो. या स्कूटरची एका चार्जमध्ये रेंज सुमारे 240 किलोमीटर असू शकते. अशा वेळी आपल्याकडे दुसरी चार्ज केलेली बॅटरी असल्यास आपण ती डिस्चार्ज बॅटरी काढून चार्ज केली बॅटरी लावू शकतो जेणेकरून त्याची रेंज दुप्पट होईल. या बॅटरी बदलण्याच्या प्रक्रियेस केवळ 5 मिनिटे लागतील. 

संबंधित बातम्या