Twitter Blue Tick: एलन मस्कचा पुन्हा युटर्न; ब्लू टिक सब्सक्रिप्शनचा निर्णय लांबणीवर

Twitter Blue Tick: ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरवरील ब्लू टिक सब्सक्रिप्शनबाबत नवे ट्विट केले आहे.
Twitter Blue Tick
Twitter Blue TickDainik Gomantak

ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी ट्विटरवरील ब्लू टिक सब्सक्रिप्शनचा निर्णय स्थगित केला आहे. ब्लू टिक सब्सक्रिप्शनचा 29 नोव्हेंबरपर्यंत सुरु होईल अशी घोषणा मस्क यांनी केली होती. पण आता हा निर्णय लांबवण्यात आला आहे. एलन मस्क (Elon Musk) यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

  • आठ डॉलरच्या ब्लू टिक व्हेरिफिकेशनचं री-लाँचिंग थांबवलं

एलन मस्क यांनी ट्विट करत म्हटले की, ब्लू टिक सबस्क्रिप्शन लाँच करण्याचा निर्णय तूर्तास थांबवण्यात आला आहे. एलन मस्क यांनी ट्विट करत लिहिले की, बनावट अकाऊंटला पूर्णपणे आळा घालण्यासाठी योग्य मार्ग सापडेपर्यंत ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा लाँच करणे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यक्ती आणि संस्थांसाठी वेगळ्या रंगाची टीक वापरण्याचा विचारही सुरु आहे.

  • वेगळ्या रंगाच्या टिक वापरण्याचा विचार सुरु

एलन मस्क यांनी आठ डॉलरच्या ब्लू टिक व्हेरिफिकेशनचं री-लाँचिंग थांबवलं आहे. रिपोर्टनुसार, युजर्सना ब्लू टिक पेड सबस्क्रिप्शनसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल. एलन मस्क यांनी सांगितले की, जोपर्यंत या प्लॅटफॉर्मवर फेक अकाऊंट बंद करता येतील याची खात्री होत नाही तोपर्यंत ते ब्लू टिक व्हेरिफिकेशनचं री-लाँचिंग थांबवण्यात येत आहेत. तसेच कंपनी व्यक्ती आणि संस्था यांच्यासाठी वेगळ्या रंगाचं टिक आणण्याचा विचार करत आहे. येत्या काळात याबाबत अधिक अपडेट समोर येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com