ट्विटर पोलनंतर इलॉन मस्कने टेस्लाचे $1.1 अब्ज किमतींचे शेअर्स विकले

मस्कने टेस्लामधील जवळपास 3.6 दशलक्ष शेअर्स विकले.
Elon Musk
Elon MuskDainik Gomantak

यूएस स्टॉक मार्केट रेग्युलेटरकडे दाखल केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क (Elon Musk) यांनी कर भरण्यासाठी, जवळपास $1.1 बिलियन पेक्षा जास्त किमतीचे 9 लाख 30 हजारांचे टेस्ला शेअर्स विकले आहेत.

त्याने आपल्या टेस्ला स्टॉकपैकी 10% विक्री करावी का असे एका सर्वेक्षणात फॉलोअर्सना विचारल्यानंतर हा प्रकार घडला, ज्याला ट्विटर वापरकर्त्यांनी 'होय' असे मत दिले. 2016 पासून टेस्ला सहभागांची ही अब्जाधीशांची पहिली विक्री आहे, असा ब्लूमबर्गने (Bloomberg) अहवाल दिला आहे.

Elon Musk
'या' कंपन्या पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन करणार बंद

त्याने त्याच्या 63 दशलक्ष ट्विटर फॉलोअर्सना टेस्लामधील त्याच्या 10% हिस्सेदारीची विक्री करावी की नाही असे विचारले होते. बुधवारी फॉलोअर्सचे मतघेतल्यानंतर दोन दिवसांत कंपनीचे शेअर्स सुमारे 16% घसरले.

टेस्ला ही जगातील सर्वात मौल्यवान कार निर्माण करणारी कंपनी आहे, ज्याचे स्टॉक मार्केट मध्ये मूल्य $1tn पेक्षा जास्त आहे. मस्कच्या ट्रस्टने टेस्लामधील जवळपास 3.6 दशलक्ष शेअर्स विकले, ज्याची किंमत सुमारे $4 अब्ज एवढी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com