WFH: 'पुरे झाले, ऑफिसला या नाहीतर कारवाई होईल', TCS ने भरला कर्मचाऱ्यांना दम!

Work From Home: भारतीय आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कर्मचारी ऑफिसला येत नाहीत म्हणून त्रस्त आहे.
TCS
TCSDainik Gomantak

TCS News: भारतीय आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कर्मचारी ऑफिसला येत नाहीत म्हणून त्रस्त आहे. यासाठी कंपनीने अनेक प्रयत्नही केले परंतु सर्व अपयशी ठरले. कर्मचार्‍यांना कार्यालयात येण्यास प्रवृत्त करण्यासाठी टीसीएसने सोशल मीडियावर मोहीम देखील चालवली, परंतु त्याचा फारसा फायदा झाला नाही.

दरम्यान, कंपनीने आता कडक ताकीद देत कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस ऑफिसमधून काम करण्याचे आदेश दिले आहेत. TCS ने कर्मचार्‍यांना त्यांच्या विहित केलेल्या रोस्टरनुसार आठवड्यातून तीनदा ऑफिसमध्ये यावे लागेल असे ईमेलद्वारे कळवले आहे.

TCS
TCS फायद्यात, 'सेन्सेक्स'च्या या कंपन्यांचे बाजारी भांडवल 1.29 लाख कोटीवर

दुसरीकडे, ईमेलने कर्मचाऱ्यांसाठी (Employees) एक कालमर्यादा निश्चित केलेली नाही, परंतु अधिक माहितीसाठी त्यांना त्यांच्या एचआरशी संपर्क साधावा लागेल. आदेशाचे पालन न केल्यास प्रशासकीय कारवाई केली जाऊ शकते, असे मेलमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. कोरोना काळात घरुन काम करण्याची मुभ कंपनीने दिली होती.

मेलमध्ये काय म्हटले आहे?

कंपनीने जारी केलेल्या मेलमध्ये पुढे असेही म्हटले आहे की, 'तुम्हाला माहिती आहे की, आपण ऑफिसमधून (Office) काम करण्यास सुरुवात केली आहे. आपले वरिष्ठ सहकारीही आता काही काळापासून ऑफिसमधूनच काम करत आहेत. कारण परिस्थिती सामान्य झाली आहे. त्यामुळे आता इतर कर्मचाऱ्यांनी सुध्दा ऑफिसमधून काम सुरु करावे.'

TCS
TCS Hiring Plan: देशातील सर्वात मोठी कंपनी करणार 40 हजार फ्रेशर्सची भरती

तसेच, 'रिटर्न टू ऑफिस' उपक्रमाचा भाग म्हणून, सर्व TCSers नी आठवड्यातून किमान 3 दिवस ऑफिसमधून काम करणे अपेक्षित आहे. तुमचे संबंधित व्यवस्थापक आता तुम्हाला ऑफिसमधून काम करण्यासाठी रोस्टर जारी करतील. त्याचबरोबर, तुम्हाला त्यासंबंधीची माहिती दिली जाईल. तुम्हाला काही मदत हवी असल्यास, कृपया तुम्ही तुमच्या HR शी संपर्क साधावा.

'रोस्टिंग अनिवार्य'

मेलनुसार, 'कृपया लक्षात घ्या की, रोस्टिंगचे पालन करणे अनिवार्य आहे. तुमच्या उपस्थितीचा मागोवा घेतला जाईल. त्याचबरोबर कोणत्याही गैर-अनुपालनाची गांभीर्याने दखल घेतली जाईल. तसेच, प्रशासकीय कारवाई देखील केली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com