Facebook WhatsApp Instagram ठप्प, कंपनीला 44 हजार कोटींचा फटका
Facebook WhatsApp Instagram down Mark Zuckerberg loses 6 billion dollarsDainik Gomantak

Facebook WhatsApp Instagram ठप्प, कंपनीला 44 हजार कोटींचा फटका

काल या सगळ्या प्रकरणानंतर सोशल मीडिया कंपनीचा शेअर 4.9 टक्क्यांनी घसरला आहे (Facebook WhatsApp Instagram down)

फेसबुक (Facebook Down), इन्स्टाग्राम (Instagram Down) आणि व्हॉट्सअॅप (WhatsApp Down),काल काही तासांसाठी गंडले होते आणि या साऱ्या प्रकरणानंतर व्हिसल ब्लोअरच्या एका खुलाशांमुळे कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांना 600 दशलक्ष डॉलरची म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 4,47,34 कोटींचा फटका बसला आहे. आणि हा फटका बसल्याने मार्क झुकरबर्ग हे जगातील श्रीमंतांच्या यादीतून थोडेसे खाली आहेत आता त्यांचा नंबर माइक्रोसॉफ्ट चे संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांच्या नंतर आला आहे. (Facebook WhatsApp Instagram down Mark Zuckerberg loses 6 billion dollars)

Facebook WhatsApp Instagram down Mark Zuckerberg loses 6 billion dollars
व्हॉट्सअॅप, फेसबुकसह इन्स्टाग्राम गंडलय; नेटकरी चिंतेत

काल या सगळ्या प्रकरणानंतर सोशल मीडिया कंपनीचा शेअर 4.9 टक्क्यांनी घसरला आहे तर सप्टेंबरच्या मध्यापासून या शेअर्समध्ये सुमारे 15 टक्के घट दिसून आली आहे. सोमवारी शेअर बदलल्यानंतर कंपनीच्या किंमत 12,160 दशलक्ष डॉलर झाली आहे. फेसबुक सीईओचे नाव आता ब्लूमबर्गच्या यादीत बिल गेट्सच्या खाली पोहोचले आहे. सोमवारी ठप्प झालेल्या फेसबुक उत्पादनांमुळे लाखो वापरकर्त्यांना हा फटका बसला आहे.

फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामच्या सेवा सोमवारी रात्री जागतिक स्तरावर बंद झाल्या होत्या, ज्यामुळे भारतासह जगभरातील हजारो वापरकर्त्यांना या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्यास त्रास सहन करावा लागला. इन्स्टाग्राम आणि मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप देखील फेसबुकच्या मालकीचे आहेत. ही समस्या भारतीय वेळेनुसार रात्री 9 च्या सुमारास सुरू झाली. वापरकर्त्यांनी तक्रार केली की ते हे तीन प्लॅटफॉर्मचा वापर करू शकत नाहीत.

Related Stories

No stories found.