एफएसीटीने शेतीविषयक आवश्यक पोषक तत्त्वे देत नफा कमावला

pib
शनिवार, 11 जुलै 2020

एफएसीटीने शेतकऱ्यांना शेतीची आवश्यक पोषक तत्त्वे उपलब्ध करून देण्यासाठी तीन जहाज खते आयात करण्यासाठी ऑर्डर दिली.  दोन जहाजे पोहोचली, उर्वरित एक ऑगस्टमध्ये येण्याची अपेक्षा. 

कंपनीने आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये विक्रमी  निव्वळ नफा कमावला

नवी दिल्ली, 

केंद्रिय रसायने आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडने (एफएसीटी) 2020-21 च्या पहिल्या तीन महिन्यात उत्पादन आणि विपणन आघाडीवर उत्साहवर्धक कामगिरी बजावली आहे.

खतांच्या व्यापाराच्या माध्यमातून सर्वंकष सुधारणा करण्याचे  कंपनीचे नियोजन आहे.  आतापर्यंत कंपनीने 3 जहाज खतांची ऑर्डर दिली आहे. यापैकी दोन जहाजांचे यापूर्वीच आगमन झाले आहे. एका जहाजामध्ये 27500 मेट्रिक टन एमओपी आणि दुसरे जहाज 27500 मेट्रिक टन कॉम्प्लेक्स फर्टिलायझरचे आहे.  तिसरे एमओपी चे जहाज जे येत्या ऑगस्टमध्ये येणे अपेक्षित आहे. 

 

 

प्रमुख देखभाल उपक्रम पूर्ण करून आणि सांडपाण्याची देखरेख करणारी ऑनलाइन पद्धतीची सुविधा स्थापित केल्यानंतर, 2020-2021 या आर्थिक वर्षात कॅप्रोलॅक्टम ऑपरेशन्स पुन्हा सुरू करण्याची योजना कंपनी आखत आहे. प्रकल्पाची चाचणी पूर्ण करण्यात आली आहे.

 

संबंधित बातम्या