आर्थिक वर्ष 2022 चा देशाचा GDP 9.1 होणार, FICCI चा दावा

FICCI ने आपल्या ताज्या इकॉनॉमिक आउटलुक सर्व्हेमध्ये FY22 मध्ये भारताचा GDP 9.1 टक्के वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
आर्थिक वर्ष 2022 चा देशाचा GDP 9.1 होणार, FICCI चा दावा
FICCI: India's GDP will grow 9.1 in FY 2022Dainik Gomantak

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) ने आपल्या ताज्या इकॉनॉमिक आउटलुक सर्व्हेमध्ये FY22 मध्ये भारताचा GDP 9.1 टक्के वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे. हे जुलै 2021 मध्ये झालेल्या सर्वेक्षण फेरीच्या तुलनेत अधिक असेल जे 9 टक्के होते.(FICCI: India's GDP will grow 9.1 in FY 2022)

" कोरोनाच्या दुस -या लाटेनंतर,देशाची आर्थिक वाढ अधिक होत आहे,व्यापारासह बाजारातही अधिक वाढ दिसत आहे त्यातच आगामी सणासुदीच्या काळात यात आणखीन वाढ नक्की होईल ," असे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीकडून सामन्यात आले आहे.

FICCI नुसार, कृषी आणि संबंधित उपक्रमांसाठी सरासरी व्यापार वाढीचा अंदाज FY22 साठी 3.2 टक्क्यांवर ठेवण्यात आला आहे. हंगामाच्या उत्तरार्धात मान्सूनच्या पावसामुळे आणि त्यानंतर खरीप क्षेत्रामध्ये वाढ झाल्यामुळे कृषी क्षेत्राच्या वाढीच्या अपेक्षा सकारात्मक राहतील अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे, उद्योग आणि सेवा क्षेत्रांमध्ये याच कालावधीत अनुक्रमे 12.9 टक्के आणि 8.6 टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या अग्रगण्य अर्थतज्ज्ञांचे सामूहिक मत आहे की भारतीय रिझर्व्ह बँक रेपो दरावर तशीच स्थिती कायम ठेवेल आणि आगामी आर्थिक धोरणात अनुकूल भूमिका कायम राहील . गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नेतृत्वाखाली आरबीआयच्या मौद्रिक धोरण समितीची (एमपीसी) बैठक सध्या सुरू आहे ती आज संपेल आणि त्यानंतर दास सर्वोच्च बँकेने घेतलेले अंतिम निर्णय जाहीर करतील.

FICCI: India's GDP will grow 9.1 in FY 2022
मोदी सरकारने राज्यांना दिला 40 हजार कोटींचा GST परतावा

"सेंट्रल बँकेसाठी वाढ हीच स्पष्ट प्राधान्य राहिली आहे आणि आर्थिक धोरणांच्या घोषणांच्या मागील फेऱ्यांमध्ये ती स्पष्टपणे कळवली गेली आहे," असे उद्योग मंडळाने म्हटले आहे. त्यात असेही म्हटले आहे की, महागाई, जी प्रमुख चिंतेचे कारण होती, गेल्या काही महिन्यांत ती एकूणच शिथिल झाली आहे. नजीकच्या काळात एक अनुकूल स्थिती व्यापकपणे राखली जाण्याची अपेक्षा आहे." फिक्कीने असेही सूचित केले की आरबीआय सामान्यीकरणाच्या दिशेने जात असतानाही पुरेशी तरलता राखणे आवश्यक राहील.

FICCI ने 2021-22 साठी CPI- आधारित चलनवाढीचा सरासरी अंदाज 5.6 टक्के ठेवला आहे, ज्याचा अनुक्रमे किमान आणि कमाल मर्यादा 5.4 टक्के आणि 5.8 टक्के आहे. किरकोळ किंमती 2021-22 मध्ये किंचित कमी होण्याचा अंदाज आहे.

Related Stories

No stories found.