अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे संकेत; सलग पाचव्या महिन्यात जीएसटी लाख कोटींच्या वर   

दैनिक गोमन्तक
सोमवार, 1 मार्च 2021

नवीन वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये जीएसटीचा महसूल 1.13 लाख कोटींपेक्षा अधिक जमा झाला असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिली आज दिली आहे.

नवीन वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये जीएसटीचा महसूल 1.13 लाख कोटींपेक्षा अधिक जमा झाला असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिली आज दिली आहे. आणि त्यामुळे वार्षिक आधारावर जीएसटीच्या महसुलात सात टक्क्यांची वाढ झाल्याचे मंत्रालयाने नमूद केले. याशिवाय सलग पाच महिन्यांपासून जीएसटीच्या द्वारे जमा होणाऱ्या महसुलाचा आकडा एक लाख कोटींच्या वर पोहचला आहे. त्यामुळे अर्तव्यवस्था पुन्हा उभारी घेत असल्याचे अर्थमंत्रालयाने आज सांगितले. 

Share Market : महिन्याच्या पहिल्या सत्रव्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ  

अर्थ मंत्रालयाने आज फेब्रुवारीत जमा झालेल्या अप्रत्यक्ष कर जीएसटीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार फेब्रुवारीमध्ये जीएसटीच्या माध्यमातून एकूण 1,13,143 कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले. यातील सीजीएसटी मध्ये 21,092 कोटी, एसजीएसटीत 27,273 कोटी आणि आयजीएसटीतून 55,253 कोटी रुपये कर जमा झाला आहे. तसेच सेसच्या रूपात 9,525 कोटी रुपये जमा झाले असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिली. परंतु फेब्रुवारीतील अप्रत्यक्ष कर स्वरूपात जमा झालेला महसूल हा नवीन वर्षाच्या पहिल्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत कमी झालेला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात 1,19,875 कोटी रुपयांचा ऐतिहासिक जीएसटी संग्रह झाला होता. 

याव्यतिरिक्त, मागील सलग पाच महिन्यांपासून जीएसटीतुन मिळणारे उत्पन्न हे एक लाख कोटींच्या वर असल्याचे अधोरेखित करत, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा फेब्रुवारीमध्ये सात टक्क्यांची वाढ नोंदली गेली असल्याचे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले. तसेच गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत यावर्षी फेब्रुवारीमध्ये वस्तूंच्या आयातीतून मिळणाऱ्या करात 15 टक्के वाढ झाली असल्याचे मंत्रालयाने सांगितले. त्यानंतर देशांतर्गत व्यवहारांमध्ये (सेवांच्या आयातीसह) देखील पाच टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे वित्त मंत्रालयाने सांगितले.   

संबंधित बातम्या