भारत म्हणजे 'संधीचे भांडार' अर्थमंत्र्यांचं अमेरिकेन उद्योजकांना आमंत्रण

सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी अनेक बड्या अमेरिकन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांची माहिती देखील दिली
भारत म्हणजे 'संधीचे भांडार' अर्थमंत्र्यांचं अमेरिकेन उद्योजकांना आमंत्रण
Finance Minister Nirmala Sitharaman invites USA businessman to invest in India Dainik Gomantak

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अमेरिकेतील (USA) बड्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना, भारतात गुंतवणूकदार (Invest In India) आणि व्यावसायिक कंपन्यांसाठी ‘संधींचे भांडार’ आहे.असे सांगत FDI साठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगितले आहे. सीतारामण यांनी अनेक बड्या अमेरिकन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांची माहिती देखील दिली आहे .(Finance Minister Nirmala Sitharaman invites USA businessman to invest in India)

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकांना उपस्थित राहण्यासाठी सीतामारण सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दोन संस्थांच्या बैठकीच्या वेळी, त्या भारतात उपस्थित असलेल्या अनेक शीर्ष अमेरिकन कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटत आहे आणि तेथे गुंतवणुकीच्या संधींचे भांडवल करण्यात रस दाखवत आहे.

अर्थमंत्रालयाने एमवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद पंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत संशोधन आणि विकास, उत्पादन स्वचालन, नवकल्पना आणि पोषण संबंधित क्षेत्रांवर चर्चा झाली असल्याचे स्प्ष्ट केले आहे. अर्थमंत्र्यांनी नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर मास्टर प्लॅनद्वारे नुकतीच सुरू केलेली नॅशनल मोनेटाइझेशन पाईपलाईन आणि गुजरातमधील गिफ्ट सिटीमध्ये भरपूर संधीं असल्याचे उल्लेखदेखील केला.

Finance Minister Nirmala Sitharaman invites USA businessman to invest in India
भारतीय अर्थव्यवस्था रुळावर, वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षांचं मोठं विधान

सीतारमण आणि बोईंग चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर बी मार्कलन यांच्या भेटीदरम्यान कौशल्य, आर अँड डी, मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन, इनोव्हेशन आणि एरोस्पेस सेक्टरवर विस्तृत चर्चा झाली असून 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्मित भारत' सारख्या उपक्रमांमध्ये बोईंगमध्ये गुंतवणूक आणि पाठिंबा देण्यासाठी कंपनीचे हितावर चर्चा झाली आहे.

Related Stories

No stories found.