...या प्रश्नाचं उत्त देतांना अर्थमंत्र्यांवर ओढावलं धर्मसंकट

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

सरकारचे म्हणणे आहे की तेलाच्या किंमती कमी करणे त्यांच्या हातात नाही. सरकारचे म्हणने आहे की, तेलाच्या किंमती सरकार नाही तर तेल कंपन्या तेलाच्या किंमतीबाबत निर्णय घेत आहेत. 

अहमदाबाद: तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे विरोधी पक्ष सरकारवर हल्लाबोल करीत आहे, तर सरकार या प्रकरणाबाबत टाळाटाळ करत आहे. तेलाच्या वाढत्या किंमतींबाबत विरोधी पक्ष सरकारला घेराव घालत आहेत, तर सरकारचे म्हणणे आहे की तेलाच्या किंमती कमी करणे त्यांच्या हातात नाही. सरकारचे म्हणने आहे की, तेलाच्या किंमती सरकार नाही तर तेल कंपन्या तेलाच्या किंमतीबाबत निर्णय घेत आहेत. तेलाच्या किंमती आपल्या हातात नाही असे म्हटल्याचे प्रकरणं बऱ्याचदा घडले आहे.

यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तेलाच्या वाढत्या किंमतींबाबत निवेदन दिले आहे. अहमदाबादमधील एका परिषदेदरम्यान जेव्हा त्यांना विचारले गेले की तेलाच्या वाढत्या किंमतींवर सरकार कधी लगाम घालणार? या प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या, "कधी होईल ... मी याबद्दल सांगू शकत नाही आत्ता यावर काहीही बोलणे म्हणजे एखाद्या धार्मिक संकटासारखे आहे,"  मी धर्मसंकटात आहे असे म्हणत त्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले.

अहमदाबाद येथिल एका प्रेस कॉन्फरन्स दरम्यान, ग्राहकांना जास्त किंमतींपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सेस किंवा इतर कर कमी करण्याचा विचार करीत आहे काय? असा प्रश्न अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना विचारला असता, या प्रश्नाने त्यांना 'धर्म-संकटा' मध्ये टाकले आहे, असे सीतारमण म्हणाल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे की ग्राहकांवर वाढलेल्या किंमतींचा ओढा कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी बोलले पाहिजे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर काय म्हणाले

केंद्राकडून महसूल मिळतो ही वस्तुस्थिती लपलेली नाही, असे सीतारमण म्हणाल्या. राज्यांचीही अशीच परिस्थिती आहे. “मी मान्य करतो की ग्राहकांवरचं ओझं कमी व्हायला हवं.” यापुर्वी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्ये यांच्यात समन्वित कारवाई आवश्यक आहे.

 

 

संबंधित बातम्या