बँकांच्या खासगीकरणाबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांचं मोठं विधान

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 16 मार्च 2021

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशातील सर्व बँकांचे खासगीकरण होणार नसल्याची माहिती दिली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशातील सर्व बँकांचे खासगीकरण होणार नसल्याची माहिती दिली. याशिवाय खासगीकरण करण्यात येत  असलेल्या बँकांच्या सर्व कर्मचार्‍यांचे हित जपले जाणार नसल्याची आज निर्मला सीतारमण यांनी सांगितले. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने दोन सरकारी मालकीच्या बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली होती, परंतु अद्याप त्यांची नावे जाहीर केलेली नाहीत. मात्र सरकारच्या या घोषणेनंतर सर्वच खासगी बँकांचे खासगीकरण करण्यात येणार असल्याची चुकीची माहिती पसरवण्यात येत असल्याचे निर्मला सीतारमण यांनी आज सांगितले. 

''सचिन वाझे प्रकरणाचा राज्यातील सरकारवर परिणाम होणार नाही''

बँकांचे खासगीकरण आणि निर्गुंतवणुकीसंदर्भातील अन्य निर्णयाच्या विरोधात बँक कर्मचारी दोन दिवसांचा संप करत आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याबाबत बोलताना देशातील सगळ्याच बँकांचे खासगीकरण करण्यात येणार नसल्याचे सांगितले. तर युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन अंतर्गत देशातील बँकांनी संप पुकारला आहे. आणि यात नऊ प्रमुख बँक संघटनांचा समावेश आहे. त्यानंतर अर्थसंकल्पात दोन बँकांच्या खासगीकरणाचा निर्णय हा विचार करूनच घेण्यात आल्याची माहिती आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली. तसेच या निर्णयात कोणतीही घाई करण्यात आली नसल्याचे त्या म्हणाल्या. 

जखमी वाघीण घातक ठरेल असे म्हणत ममता बॅनर्जींचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

याशिवाय, सरकारकडून घेण्यात आलेला निर्णय हा देशातील बँकांच्या सक्षमीकरणासाठी म्हणूनच घेण्यात आल्याचे निर्मला सीतारमण यांनी पुढे सांगितले. व बँकांच्या सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व कर्मचार्‍यांचे हित कोणत्याही किंमतीत सुरक्षित ठेवले जाणार असल्याची पुस्ती निर्मला सीतारमण यांनी यावेळी जोडली. तसेच ज्या बँकांचे खासगीकरण होणार आहे त्या बँकांचे कामकाम पूर्वीप्रमाणेच चालू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर, कर्मचार्‍यांच्या हिताचे कोणतेही नुकसान होणार नसल्याची माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली. इतकेच नाही तर, केंद्रीय मंत्रिमंडळाने विकास वित्त संस्था (डीएफआय) स्थापन करण्यास मान्यता दिली असल्याचे त्यांनी नमूद केले. आणि त्याअंतर्गत आर्थिक निधीतून विकास कामे निश्चित केली जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.  

संबंधित बातम्या