
Finance Ministry: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पापूर्वी बँकांसोबत बैठक घेतली. या बैठकीत खासगी क्षेत्रातील बँक अधिकारी उपस्थित होते. यासोबतच शासकीय योजनांच्या प्रगतीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत जन धन योजना, अटल पेन्शन योजना, पीएम मुद्रा कर्ज यासह अनेक सरकारी योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली, जेणेकरुन, देशातील सर्व गरजू लोकांना या योजनांचा लाभ योग्य वेळी मिळू शकेल.
फायन्सशिअल सर्विस सचिव विवेक जोशी यांनी मंगळवारी खाजगी क्षेत्रातील बँक (Bank) अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रमुख आर्थिक समावेशन आणि सामाजिक सुरक्षा योजनांबाबत केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला.
वित्तीय सेवा विभागाने ट्विटमध्ये म्हटले की, खाजगी क्षेत्रातील बँका, लघु वित्त बँका आणि पेमेंट बँकांचे प्रतिनिधी आज वित्तीय सेवा विभागाचे सचिव डॉ. विवेक जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपस्थित होते. बैठकीत आर्थिक समावेशाच्या विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
जोशी यांनी गेल्या आठवड्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांची भेट घेतली आणि त्यांना विविध योजनांसाठी चालू आर्थिक वर्षातील उद्दिष्ट साध्य करण्याचे आवाहन केले.
बैठकीत विविध सामाजिक सुरक्षा, प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY), प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY), अटल पेन्शन योजना (APY), प्रधान मंत्री मुद्रा योजना आणि प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स सेल्फ रिलेंट फंड (PMSvanidhi) आणि अॅग्री क्रेडिट इत्यादींच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
वित्त सेवा सचिव विवेक जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रधानमंत्री जन धन योजनेचा (PMJDY) आढावा घेण्यात आला. याशिवाय, रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी पंतप्रधान स्वावलंबी निधी (पीएम स्वानिधी) योजनेच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. सरकारने (Government) ही योजना डिसेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.