आता कोणीही घेऊ शकतं iPhone..!; फ्लिपकार्टच्या इलेक्ट्रॉनिक सेलमध्ये फोन्सवर मोठी सुट

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 डिसेंबर 2020

iPhone 11 Pro या फोनवर अतिशय मोठी सुट देण्यात आली असून हा फोन घेणाऱ्यांसाठी २० हजारांपर्यंतची सुट देण्यात आली आहे.

अ‍ॅपल कंपनीचे फोन अर्थात आयफोन कायमच अनेकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असते. मात्र, त्याच्या वाढीव किंमतीमुळे प्रत्येकाला आयफोन घेणं शक्य होत नाही. मात्र, आयफोन घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आता फेसबुकने एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली. फ्लिपकार्टवर आजपासून (२६ डिसेंबर) इलेक्ट्रॉनिक सेल सुरू झाला असून यामध्ये स्मार्टफोन्सवर चांगल्याच ऑफर देण्यात येत आहेत. सेलसाठी लाईव्ह आलेल्या फ्लिपकार्टच्या पेजवरून याबाबत माहिती देण्यात आली ज्यात ICICI बँकेच्या कार्डाद्वारे शॉपिंग केल्यास १० टक्क्यांची सुटही देण्यात येणार आहे.      

याच सेलमध्येच iPhone 11 Pro या फोनवर अतिशय मोठी सुट देण्यात आली असून हा फोन घेणाऱ्यांसाठी २० हजारांपर्यंतची सुट देण्यात आली आहे.  डिस्काउंट मिळाल्यानंतर तुम्ही हा फोन फक्त ७९९९९ रूपयांमध्ये खरेदी करू शकता. या फोनची बाजारातील किंमत ९९,९९९ रूपये एवढी असून या फोनवर तब्बल २० हजारांची सुट दिली आहे. एवढेच नव्हे तर ग्राहक या फोनवर एक्सचेंज ऑफरचा फायदाही घेऊ शकणार आहेत. ज्यात तुम्हाला २६, ६०१ पर्यंतची एक नवीन ऑफरही मिळणार आहे. फ्लिपकार्टच्या 'इलेक्ट्रॉनिक सेल' या विभागात  तुम्हाला हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे दिसेल. आयफोन घेणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून तुम्ही आजच हा फोन खरेदी करून या सेलचा उपयोग करून घेऊ शकता.      
 
काय आहेत iPhone 11 Proचे खास फिचर्स 

  • iPhone 11 Proमध्ये ५.८ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर ओलेड डिस्प्ले आहे. 
  • या फोनची स्क्रीन हिपॅटीक टचला सपोर्ट करते.
  • हा फोन टेक्सचर्ड मेटल ग्लास आणि स्टेनलेस स्टील डिझाईन्ड आहे.
  • ip68 अशी रेटिंग या फोनला मिळाली आहे. 
  • A13 बायोनिक चिपसेटचा वापर या फोनमध्ये केला गेला आहे. 
  • यात Third Generation neural Engine आहे. 

  
आणखी काही फिचर्स

iPhone 11 Proच्या रियरवर तीन-तीन कॅमेरे आहेत. यामुळे अॅपलने याला प्रो कॅमेरा सिस्टिम असे नाव दिले आहे. या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचे तीन सेन्सर्स आहेत. हा फोन एफ/ 1.8 वाइड एंगल, एफ/ 2.4 अल्ट्रा-वाइड-अँगल आणि एफ/ 2.4 टेलीफोटो लेंस आहे. वाइड-अँगल आणि टेलीफोटो कॅमरे ऑप्टिकल इमेज स्टेबलायझेशनसोबत येतात. या फोनमध्ये इनहान्सड नाईट मोडही आहे. अपडेटेड पोर्ट्रेट मोड, स्मार्ट एचडीआर सारखे फीचरही उपलब्ध आहेत. हा फोन १२ मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासोबत येणार असून आपला सेल्फी घेण्याचा आनंद द्विगुणित करेल.  

संबंधित बातम्या