फ्लिपकार्ट अदानी ग्रुपमध्ये सामील, 2500 लोकांना मिळणार रोजगार

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 12 एप्रिल 2021

वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने सोमवारी अदानी ग्रुपशी हातमिळवणी केली आहे. कंपनीच्या वतीने निवेदन देण्यात आले की ही लॉजिस्टिक्स व डेटा सेंटर क्षमता बळकट करण्यासाठी ही हातमिळवणी केली गेली आहे.

नवी मुंबई: वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने सोमवारी अदानी ग्रुपशी हातमिळवणी केली आहे. कंपनीच्या वतीने निवेदन देण्यात आले की ही लॉजिस्टिक्स व डेटा सेंटर क्षमता बळकट करण्यासाठी ही हातमिळवणी केली गेली आहे. यामुळे सुमारे 2500 लोकांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच लघु व मध्यम व्यावसायिकांना मदत मिळणार आहे.

या कराराअनुसार फ्लिपकार्ट अदानी पोर्ट्स लिमिटेड आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडची संपूर्ण मालकीची कंपनी असलेल्या अदानी लॉजिस्टिक लिमिटेडबरोबर काम करेल. यामुळे पुरवठा साखळीची पायाभूत सुविधा मजबूत करण्यात मदत होईल. याद्वारे ग्राहकांना जलद सेवा पुरविली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

फ्लिपकार्ट तिसऱ्या डेटा सेंटरची स्थापना करणार

फ्लिपकार्ट लवकरच आपल्या तिसऱ्या डेटा सेंटरचे अनावरण करणार आहे. हे केंद्र अदानी कॉनेक्सच्या चेन्नईमध्ये उभारले जाणार आहे. हे अदानी कॉनेक्स, एजकॉनेक्स आणि अदानी इंटरप्राईजेस लिमिटेड यांच्यात संयुक्त विद्यमाने ओपन होणार आहे. मात्र अद्याप कंपनीने त्याच्या आर्थिक तपशीलांविषयी फारशी माहिती दिली नाही.

घरबसल्या तुमच्या वाहनावरील ई-चलन चेक करा आणि ऑनलाईनच भरा 

फ्लिपकार्टच्या भागीदारीत अदानी लॉजिस्टिक लिमिटेड मुंबईत आगामी लॉजिस्टिक हबमध्ये 5.34 लाख चौरस फूट क्षेत्रासह गोदाम तयार करणार आहे. पश्चिम भारतातील ई-कॉमर्सची वाढती मागणी भागविण्यासाठी फ्लिपकार्टला हे भाड्याने देण्यात येणार आहे. हे केंद्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असणार आहे. अशी अपेक्षा आहे की 2022 च्या तिसर्‍या तिमाहीपर्यंत हे सुरू करण्यात येईल. या केंद्रामध्ये विक्रीसाठी एक कोटी युनिट ठेवण्याची क्षमता असणार आहे.

संबंधित बातम्या