थेट परकीय गुंतवणुकीने मोडला आतापर्यंतचा रेकॉर्ड, भारत बनला पसंतीचा देश

देशात महागाईचा भडका उडाला असताना दुसरीकडे, 2021-22 या आर्थिक वर्षात थेट परकीय गुंतवणुकीत (FDI) विक्रमी वाढ झाली आहे.
थेट परकीय गुंतवणुकीने मोडला आतापर्यंतचा रेकॉर्ड, भारत बनला पसंतीचा देश
FDIDainik Gomantak

देशात महागाईचा भडका उडाला असताना दुसरीकडे, 2021-22 या आर्थिक वर्षात थेट परकीय गुंतवणुकीत विक्रमी वाढ झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली. मंत्रालयाने म्हटले आहे की, भारताने 2021-22 मध्ये सर्वाधिक वार्षिक एफडीआय म्हणजेच US $ 83.57 अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक नोंदवली आहे. 2020-21 मध्ये ते US $81.97 अब्ज होते. (foreign direct investment in India jumps to the highest ever in)

दरम्यान, शुक्रवारी आपल्या अधिकृत निवेदनात, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने स्पष्ट केले की, 'भारताने 2021-22 या आर्थिक वर्षात US $ 83.57 अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक गाठली आहे, जी आतापर्यंतच्या कोणत्याही आर्थिक वर्षातील सर्वाधिक आहे.' पीटीआय या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात भारताने 83.57 अब्ज डॉलरचा वार्षिक एफडीआय (FDI) नोंदवला आहे.

FDI
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स 1000 हून अधिक अंकांनी वधारला

भारत गुंतवणुकीसाठी पसंतीचा देश बनतोय

मंत्रालयाने सांगितले की, भारत (India) उत्पादन क्षेत्रात परकीय गुंतवणुकीसाठी पसंतीचा देश म्हणून वेगाने उदयास येत आहे. गेल्या आर्थिक वर्ष 2020-21 च्या तुलनेत मॅन्युफॅक्चरिंगमधील एफडीआय इक्विटी प्रवाहात 76 टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे. 2020-21 मध्ये US$ 12.09 बिलियनच्या तुलनेत 2021-22 मध्ये FDI इक्विटीचा प्रवाह US$ 21.34 बिलियन होता.

FDI
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात तेजी, सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी वधारला

प्रमुख गुंतवणूकदार देशांच्या बाबतीत सिंगापूर (Singapore) 27 टक्क्यांसह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ अमेरिका आणि मॉरिशसचा क्रमांक लागतो. अमेरिका 18 टक्क्यांसह दुसऱ्या, तर 16 टक्क्यांसह मॉरिशस तिसऱ्या क्रमांकावर आहे. मंत्रालयाने सांगितले की, कंप्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्रात सर्वाधिक एफडीआय नोंदवला गेला आहे. त्यापाठोपाठ सेवा क्षेत्र आणि ऑटोमोबाईल उद्योगाने सर्वाधिक एफडीआय नोंदवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com