BMW ची G 310 RR भारतात लॉंच

4000 रुपयांपेक्षा कमी हप्त्यांमध्ये घरी आणता येईल
BMW
BMWdainik gomantak

भारतात BMW ने आपली नवीन मोटरसायकल लॉंच केली आहे. BMW जी 310 RRअसे या मोटरसायकलचे नाव आहे.ही एक Sport Bike असून कंपनीने या मोटरसायकलची किंमत 2 लाख 85 हजार रुपये येवढी आहे. तर ही मोटरसायकल केवळ 4000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सुलभ हप्त्यांमध्ये खरेदी करू शकतो.

BMW जी 310 RR ही दोन प्रकारांमध्ये लॉंच करण्यात आली आहे,त्यापैकी एकाची किंमत 2.85 लाख रुपये आहे. तर स्टाइल स्पोर्ट्स मॉडेलची किंमत 2.99 लाख रुपये इतकी आहे. दोन्ही किंमती एक्स-शोरूम आहेत,BMW च्या या नवीन मोटरसायकलचा प्लॅटफॉर्म TVS Apache RR 310 एंट्री लेव्हल सारखा आहे. मोटारसायकालची रचना आणि काही वैशिष्ट्ये एकसारखी आहेत.

BMW
खेलो इंडिया खेळाडूंकडून आता पदकांची अपेक्षा

बीएमडब्ल्यू जी 310 RR चे फीचर्स

TVS Apache प्रमाणे याची रचना करण्यात आली आहे. यात पुढील बाजूस ड्युअल बीम हेडलॅम्प्स आहेत. तसेच स्प्लिट सीट, हँडलबार तळाशी देण्यात आले आहेत. मागील बाजूस एलईडी टेललाइट्स देखील आहेत. या BMW मोटारसायकलला अलॉय व्हीलचे डिझाइन दिले आहे,जे लाल फ्रेमसह आहेत.

BMW G310 RR चे इंजिन

या मोटरसायकलमध्ये 313 सीसी,सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 33.5 bhp पॉवर आणि 28 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. मोटारसायकल 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे आणि स्लिपर क्लचसह येते.

BMW G310 RR वर सुलभ हप्ताचे पर्याय

ही मोटरसायकल रु.4000 पेक्षा कमी हप्त्यांमध्ये खरेदी करतो येइल,याची माहिती एचटी ऑटोने शेअर केली आहे.भारतीय बाजारपेठेत बीएमडब्ल्यू बाईक खरेदी करणार्या लोकांसाठी बीएमडब्ल्यू इंडिया फायनान्शियल सर्व्हिस ही बाईक 0 रूपये डाऊन पेमेंटमध्ये खरेदी करण्याचा पर्याय देणार आहे. यानंतर फक्त 3999 रुपयांचे सुलभ मासिक हप्ते भरावे लागतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com