ऐन नाताळात गोमंतकीयांच्या चुलीला 'गॅस' परवडणार नाही

गोमंतक ऑनलाईन टीम
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

राज्यात घरगुती वापरासाठीचा गॅस सिलेंडर ५० रूपयांनी महागला आहे. गेल्या १५ दिवसांत सिलेंडरची किंमत १०० रूपयांनी वाढली असून गोव्यात आता गॅस सिलेंडरची किंमत ७०८ रुपये इतकी झाली आहे जी मागील महिन्यात ६०८ रुपये इतकी होती.

पणजी- राज्यात घरगुती वापरासाठीचा गॅस सिलेंडर ५० रूपयांनी महागला आहे. गेल्या १५ दिवसांत सिलेंडरची किंमत १०० रूपयांनी वाढली असून गोव्यात आता गॅस सिलेंडरची किंमत ७०८ रुपये इतकी झाली आहे जी मागील महिन्यात ६०८ रुपये इतकी होती.  

दरम्यान, नोव्हेंबरमध्ये स्थिर असलेले  सिलेंडरचे दर या महिन्यात अचानक वाढले आहेत. नोव्हेंबरमध्ये ६०८ रूपयांना मिळणाऱ्या सिलेंडरचे दर १ डिसेंबर रोजी ५० रुपयांनी वाढले होते. त्यावेळी ५० रूपयांनी झालेल्या या वाढीमुळे राज्यात ६५८ रुपयांना सिलेंडर मिळायला लागला होता. मात्र, त्यानंतरही यात अजून वाढ झाली. आता आणखीन ५० रुपयांनी किंमत वाढल्याने गॅस सिलेंडर ७०८ रूपयांवर पोचला आहे.  

गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. अचानक वाढलेल्या दरांनी ग्राहकांना आश्चर्यचकित केले असून येत्या काळात हे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.    ‌

संबंधित बातम्या

Tags