मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

दोन दिवसांपूर्वी गौतम अदानी यांची कंपनी 88.8 अब्ज डॉलरवर होती तर, रिलायन्स 91 अब्ज होती . अदानी समूहाच्या शेअर्सच्या वाढीमुळे गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकले आहे.
मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
Gautam Adani became richest person in Asia Dainik Gomantak

मार्केट कॅपनुसार गौतम अदानी (Gautam Adani) आता भारत (India) आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत . अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर्समध्ये मोठी रिकव्हरी दिसून आली आहे. तर, सौदी अरामकोसोबतचा कंपनीचा करार रद्द झाल्यापासून रिलायन्सच्या शेअर्सवर (Reliance Share) दबाव आहे. तज्ज्ञांच्या मते, रिलायन्स निश्चितच एक मजबूत कंपनी आहे. पण अदानी समूहाच्या मार्केट कॅपमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीने विकसित केलेली पायाभूत सुविधा.(Gautam Adani became richest person in Asia)

बाजार तज्ज्ञांच्या मते, येणाऱ्या काळात गुंतवणूकदार अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवू शकतात. हा शेअर्स फार कमी कालावधीत 20-25 टक्क्यांनी वाढू शकतो. त्यांच्या मते, गेल्या 18 महिन्यांत या स्टॉकची कामगिरी खूप चांगली झाली आहे. जून-जुलै 2021 पासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती खरी पण अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये मोठी रिकव्हरी दिसून आली आहे.

अदानी ग्रीन आणि अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्येही मोठ्या प्रमाणात रिकव्हरी झाली आहे. अदानी एंटरप्रायझेस हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तथापि, यामध्ये प्रत्येक वेळी 10 ते 15 टक्के स्विंग अपेक्षित आहे, हे देखील लक्षात ठेवले पाहिजे.त्याच वेळी, इतर काही तज्ञांचे म्हणणे आहे की अदानी पोर्ट्स गुंतवणूकदारांसाठी अधिक चांगले आहे. यात काही अडचण अशी आहे की धोका आहे. त्यांच्या मते, आज अदानी एंटरप्रायझेसची कामगिरी खूप चांगली झाली आहे. तो आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. पण अदानी एंटरप्रायझेसपेक्षा अदानी पोर्ट्स प्रथम येतील.

Gautam Adani became richest person in Asia
कर्जबुडव्यांनो आता सावधान ! मोदी सरकार उचलणार कारवाईचा बडगा

दुसरीकडे, सौदी अरामकोसोबतचा करार तुटल्यानंतर रिलायन्सच्या शेअर्सवर दबाव आहे. यावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की रिलायन्सचा शेअर आज मध्य सत्रापर्यंत चांगली कामगिरी करत होता, मात्र नंतर तो झपाट्याने घसरलेला पाहायला मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी गौतम अदानी यांची कंपनी 88.8 अब्ज डॉलरवर होती तर, रिलायन्स 91 अब्ज होती . अदानी समूहाच्या शेअर्सच्या वाढीमुळे, विशेषत: अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायझेस, गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com