गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

या वर्षात आत्तापर्यंत अदानींच्या एकूण संपत्तीत $23.5 अब्जने वाढ झाली आहे.
Gautam Adani becomes richest man in Asia
Gautam Adani becomes richest man in AsiaDainik Gomantak

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. ब्लूमबर्गच्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत ते दहाव्या स्थानावर पोहचले आहेत. त्यांची एकूण संपत्ती $100 अब्ज झाली आहे. (Gautam Adani becomes richest man in asia)

Gautam Adani becomes richest man in Asia
एअरटेल आणि टेक महिंद्रा 5G साठी एकत्र, इनोव्हेशन लॅब तयार

मालमत्तेत जोरदार वाढ
ब्लूमबर्गच्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत अदानी 10 व्या स्थानावर पोहोचले आहेत. अदानी $100 बिलियनच्या संपत्तीसह सेंटबिलियनेअर्स क्लबमध्ये सामील झाले आहेत. 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या व्यक्तींना सेंट अब्जाधीश म्हणतात. या वर्षात आत्तापर्यंत अदानींच्या एकूण संपत्तीत $23.5 अब्जने वाढ झाली आहे. या यादीतील सर्व लोकांपैकी अदानींच्या मालमत्तेत यावर्षी सर्वाधिक वाढ झाली आहे.

Gautam Adani becomes richest man in Asia
पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, तुमच्या शहरात दर किती?

अंबानी 11 व्या स्थानावर
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आता ब्लूमबर्गच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 11व्या स्थानावर आहेत. ते आशिया आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती (मुकेश अंबानी नेट वर्थ) $99 अब्ज एवढी आहे. या वर्षात आतापर्यंत अंबानींची संपत्ती $9.03 अब्जने वाढली आहे.

टेस्लाचे एलोन मस्क सर्वात श्रीमंत
ब्लूमबर्गच्या यादीनुसार, टेस्लाचे (Tesla) सीईओ एलोन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याची एकूण संपत्ती $273 अब्ज इतकी आहे. यानंतर जेफ बेझोसचे स्थान येते. त्यांची एकूण संपत्ती $188 अब्ज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com