गौतम अदानींची खरेदी! दोन राज्यांतील टोल रस्त्यांची केली खरेदी

गौतम अदानी समूहाची कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेसने टोल रस्त्याशी संबंधित एक मोठा करार केला आहे.
Adani Group
Adani Group Dainik Gomantak

गौतम अदानी (Gautam Adani) समूहाची कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेसने टोल रस्त्याशी संबंधित एक मोठा करार केला आहे तसेच या अंतर्गत, कंपनीची उपकंपनी अदानी रोड ट्रान्सपोर्ट लिमिटेड (ARTL) मॅक्वेरी एशिया इन्फ्रास्ट्रक्चर फंड (MAIF) कडून आंध्र प्रदेश टोल रोड पोर्टफोलिओ स्वर्ण टोलवे प्रायव्हेट लिमिटेड (STPL) मधील 100% हिस्सा खरेदी करणार आहे.ते गुजरात टोल रोड पोर्टफोलिओ (GRICL) मध्ये 56.8% स्टेक देखील विकत घेणार असल्याचे सांगितले जात आहे. (Gautam Adani bought toll roads in two states)

Adani Group
Flipkart Big Saving Days sale: इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर मिळणार 75 टक्के सूट

हे अधिग्रहण 3,110 कोटी रुपयांच्या एंटरप्राइझ मूल्यावर आधारीत आहे. या डील अंतर्गत पोर्टफोलिओमध्ये सुमारे ₹165 कोटी निव्वळ कर्जासह ₹456 कोटीचा LTM EBITDA देखील आहे तसेच सप्टेंबरपर्यंत हा करार पूर्ण होणे अपेक्षित आहे.

आंध्र प्रदेश येथे एसटीपीएलचे दोन टोल रस्ते आहेत, आंध्र प्रदेशातील नेल्लोर, चेन्नई आणि कृष्णपट्टणम यांसारख्या महत्त्वाच्या बंदरांशी टाडा जोडणारा NH-16 वरील एक ते 110 किमी आहे आणि त्याच वेळी, NH-65 वर नंदीगामा ते इब्राहिमपट्टणम ते विजयवाडा असा 48 किमीचा रस्ता आहे.

Adani Group
Ambani vs Adani: मुकेश अंबानी अन् गौतम अदानी उतरणार बायोगॅस क्षेत्रात

हे प्रमुख दक्षिणी मेट्रो शहरांना जोडते आणि NH16 ला फीडर रहदारी पुरवते. त्याच वेळी, गुजरातमध्ये, GRICL हा SH-41 वर अहमदाबाद ते मेहसाणा असा 51.6 किमी लांबीचा टोल रस्ता देखील आहे. याशिवाय SH-87 वर वडोदरा ते हलोल असा 31.7 किमीचा रस्ता देखील आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com