Adani Group: गौतम अदानींचे पुत्र करण संभाळणार हा नवा व्यवसाय, लवकरच घोषणा

Karan Adani: जगातील नंबर दोनचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांचे ज्येष्ठ पुत्र करण अदानी ग्रुपचा सिमेंट व्यवसाय सांभाळू शकतात.
Karan Adani
Karan AdaniDainik Gomantak

Karan Adani: जगातील नंबर दोनचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी आता आपल्या सुपुत्रावर नवी जबाबदारी सोपवणार आहेत. करण आदानी आता अदानी ग्रुपचा सिमेंट व्यवसाय सांभाळू शकतात. अलीकडेच, अदानी समूहाने सुमारे 10.5 अब्ज डॉलर्समध्ये दोन मोठ्या सिमेंट कंपन्या विकत घेतल्या आहेत. आता झपाट्याने विस्तारत असलेल्या अदानी समूहाचा हा व्यवसाय करण अदानी यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. करण अदानी सध्या पोर्ट व्यवसाय संभाळत आहेत. ते अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचे ​​सीईओही आहेत.

काय आहे गौतम अदानींची योजना?

करण यांच्यावर नव्या व्यवसायाची जबाबदारी सोपवतानाच, गौतम अदानी (Gautam Adani) सिमेंट व्यवसायाच्या वाढीसाठी प्रमुख वरिष्ठ अधिकार्‍यांची नियुक्ती करण्याचा विचार करत आहेत, असे ब्लूमबर्गने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले. इंटीग्रेटेड लॉजिस्टिक्स फर्म तयार करण्यासाठी त्यांना आदानी समूहाचे पोर्ट आणि सिमेंट व्यवसाय यांच्यात समन्वय साधायचा आहे. करण यांच्या नियुक्तीची घोषणा शुक्रवारी होऊ शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अदानी समूहाकडून (Adani Group) कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

Karan Adani
Adani Group येत्या दहा वर्षात 1,000-MW डेटा सेंटर उभारणार

गौतम अदानी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती

गौतम अदानी यांच्यासाठी हे वर्ष खूप खास ठरले आहे. त्यांच्या संपत्तीत जगातील सर्वात मोठी झेप पाहायला मिळाली आहे. फोर्ब्सनुसार, ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांच्या पुढे केवळ एलन मस्क आहेत. त्यांनी मुकेश अंबानी (Mukesh Ambani), बिल गेट्स आणि वॉरन बफे सारख्या दिग्गजांना मागे सोडले आहे. ते आता जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जेफ बेझोस यांच्या पुढे गेले आहेत. अदानी समूहाने विमानतळ, मीडिया, डिजिटल सेवा आणि दूरसंचार व्यवसायांवर वर्चस्व कायम ठेवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com