Adani Group ला सिमेंट उद्योगाचा 'सहारा', कर्ज कमी करण्यासाठी भागभांडवल विकणार!

Gautam Adani: कर्ज कमी करण्यासाठी अदानी समूहाने आपल्या सिमेंट व्यवसायातील हिस्सा विकण्याची योजना आखली आहे.
Gautam Adani
Gautam Adani Dainik Gomantak

Adani Group: कर्ज कमी करण्यासाठी अदानी समूहाने आपल्या सिमेंट व्यवसायातील हिस्सा विकण्याची योजना आखली आहे.

फायनान्शिअल टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, अदानी समूहाला अंबुजा सिमेंटमधील 4-5 टक्के हिस्सेदारी आंतरराष्ट्रीय कराराचा भाग म्हणून विकायची आहे.

ही हिस्सेदारी विकून $450 दशलक्ष उभे करण्याची योजना आहे. मात्र, अदानी समूहाकडून अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही.

गेल्या वर्षी केले होते अधिग्रहण: 2022 मध्येच, अदानी समूहाने स्विस कंपनी होल्सिमकडून अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेडचे ​​अधिग्रहण पूर्ण केले होते.

अदानी समूहाचे हे सर्वात मोठे अधिग्रहण होते. यानंतर, अदानी समूहाकडे आता अंबुजा सिमेंट्समध्ये 63.15 टक्के आणि एसीसीमध्ये 56.69 टक्के हिस्सा आहे. या संपादनाचे एकूण मूल्य $6.50 अब्ज आहे.

Gautam Adani
Adani Group: अदानी समूहाने फेडले 4096 कोटींचे कर्ज, गुंतवणूकदारांचा वाढणार विश्वास!

दुसरा सर्वात मोठा उत्पादक: या अधिग्रहणानंतर अदानी समूह (Adani Group) देशातील दुसरा सर्वात मोठा सिमेंट उत्पादक बनला आहे. सध्या, अंबुजा सिमेंट आणि ACC यांची एकत्रित स्थापित क्षमता वार्षिक 67.5 दशलक्ष टन आहे.

मात्र, अदानी समूहाच्या कर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असताना सिमेंट व्यवसायातील हिस्सेदारी विकण्याची ही बातमी आली आहे. अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गच्या अहवालातही अदानी समूहावरील प्रचंड कर्जाचा उल्लेख करण्यात आला होता.

Gautam Adani
Adani Group साठी आनंदाची बातमी, 'या' बदलामुळे गुंतवणूकदारांचा वाढणार विश्वास!

स्टॉकमध्ये घसरण: गौतम अदानी समूहाच्या दोन कंपन्या - अंबुजा सिमेंट आणि ACC शुक्रवारी अनुक्रमे 1.66% आणि 0.70% ने बंद झाल्या. अंबुजाच्या शेअरची (Share) किंमत 378.35 रुपये आणि ACC च्या शेअरची किंमत 1847.15 रुपये आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com