गोवा शिपयार्डचे कामगार आणणार

Dainik Gomantak
सोमवार, 11 मे 2020

शिपयार्डचे कामकाज ५० टक्के कामगारांना घेऊन सुरू झाले आहे.कारवार मधील कामगार लॉकडाऊन मुळे कामावर हजर राहू शकत नाहीत.

काणकोण

गोव्याशेजारील कर्नाटकाच्या उत्तर कन्नड जिल्ह्याच्या कारवार भागात लॉकडाऊन मुळे अडकून पडलेल्या गोवा शिपयार्डच्या कामगारांना वास्को येथे आणण्याचा प्रयत्न  सुरु केले आहेत.  कारवारच्या वेवेगळ्या भागात लॉकडाऊन मुळे अडकून पडलेल्या गोवा शिपयार्डच्या कामगारांना वास्को येथे आणण्यासाठी पोळे येथे कामगाराच्या प्रतिनिधीशी कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर शेट यांनी चर्चा केली.

 कारवारच्या वेवेगळ्या भागात लॉकडाऊन मुळे अडकून पडलेल्या गोवा शिपयार्डच्या कामगारांना  पून्हा वास्को  येथे आणण्याचा प्रयत्न गोवा शिपयार्ड कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर शेट यांनी सुरू केला आहे.आज कारवार तालुक्यातील माजाळी, हळगा,अस्नोटी, कोडिबाग व अन्य भागात गोवा शिपयार्ड मध्ये काम करणारे शंभर कामगार आहेत.कोविड-१९च्या पहिल्या लॉकडाऊन नंतर गोवा शिपयार्ड बंद झाल्यानंतर ते गावी गेले.मात्र लॉकडाऊनच्या तीन टप्प्यानंतर शिपयार्डचे कामकाज ५० टक्के कामगारांना घेऊन सुरू झाले आहे.कारवार मधील कामगार लॉकडाऊन मुळे कामावर हजर राहू शकत नाहीत त्यासाठी सर्व सोपस्कार करून त्यांना वास्को येथे आणण्यासाठी चर्चा करण्यासाठी आज पोळे तपासणी नाक्यावर कामगाराच्या प्रतिनिधी गटाशी चर्चा करण्यात आली.यावेळी आमदार दिपाली नाईक याचे निजी सचिव उपस्थित होते असे संघटनेचे अध्यक्ष किशोर शेट यांनी सांगितले. या कामगारांना आणण्यासाठी त्यांनी वैयक्तिकरित्या दक्षिण जिल्हखधिकाऱ्याकडे पाससाठी अर्ज करण्याची गरज आहे.पासेस तयार झाल्यानंतर. शिपयार्ड या सर्व कामगारांना खास वाहनाने पोळे तपासणी नाक्यावरून वास्कोला आणणार आहे त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याचे विलगीकरण करण्यात येणार असल्याचे शेट यांनी सांगितले. या वेळी त्याच्यासोबत संघटनेचे शुभम शेट,राजदत्त शेट उपस्थित होते.

संबंधित बातम्या