गोवा राज्य सरकार आणखी १०० कोटींचे  कर्जरोखे घेणार

दौनिक गोमन्तक
शनिवार, 12 डिसेंबर 2020

राज्य सरकारने भांडवली खर्चासाठी आणखी १०० कोटी रुपयांचे कर्जरोखे बाजारातून घेण्याचे ठरवले आहे. यासाठी १६ डिसेंबर रोजी रोख्यांची विक्री मुंबईत भारतीय रिझर्व्ह बॅंक ऑनलाईन पद्धतीने करणार आहे. 

पणजी  : राज्य सरकारने भांडवली खर्चासाठी आणखी १०० कोटी रुपयांचे कर्जरोखे बाजारातून घेण्याचे ठरवले आहे. यासाठी १६ डिसेंबर रोजी रोख्यांची विक्री मुंबईत भारतीय रिझर्व्ह बॅंक ऑनलाईन पद्धतीने करणार आहे. 

 

गोवा मुक्तीदिन षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळ्यासाठी केंद्र सरकारकडून १०० कोटी रुपये मिळावेत, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे. तत्पूर्वी हे कर्ज घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारचा महसूल आता रुळावर येत असल्याचे अलीकडेच नमूद केले होते. तरीही भांडवली खर्चासाठी सरकारला आणखी १०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची वेळ आली आहे. या कर्जाची परतफेड १६ डिसेंबर २०३० रोजी करण्यात येणार आहे. या कर्जरोख्यांवर १६ जून व १६ डिसेंबरला वार्षिक व्याज फेडावे लागणार आहे. प्रत्येकी १० हजार रुपये दर्शनी मुल्याचे हे रोखे आहेत.

 

संबंधित बातम्या