ग्राहकांची चांदी! चांदीच्या दरात २० हजारांची घसरण

दैनिक गोमन्तक
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात चांदीचे दर 59 हजार 100 रुपयांवर बंद झाले होते. म्हणजे मागील साडे तीन महिन्यांत चांदी 20 हजार 600 रुपयांनी उतरली आहे.
 

नवी दिल्ली- कोरोनाकाळात जगभरातील भांडवली बाजारांमध्ये कमालीच्या निच्चांकाची नोंद झाली असून सोने आणि चांदी यात अनेकांनी मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळे सोने व चांदीच्या दरांमध्ये वाढ झाली होती. सोन्याची किंमत 10 ग्रॅमसाठी 56 हजार इतकी गेली होती, तर चांदीच्या दरातही कमाल वाढ होऊन 79 हजारांपर्यंत दर गेले होते.    

 दोन महिन्यांपूर्वी चांदीचे दर होते 79 हजारांपर्यंत-

ऑगस्टमध्ये चांदीने रेकॉर्ड ब्रेक दर गाठले होते. प्रतिकिलोला चांदीचा भाव 79 हजार 723 पर्यंत पोहचला होता. परंतु, सत्राच्या शेवटी दर 76 हजार 255 वर बाजार बंद झाला होता. यानंतर चांदीच्या दरात मोठी घसरण होताना दिसली आहे. या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात चांदीचे दर 59 हजार 100 रुपयांवर बंद झाले होते. म्हणजे मागील साडे तीन महिन्यांत चांदी 20 हजार 600 रुपयांनी उतरली आहे.
 
 आता चांदीचे दर घसरून 59 हजारांपर्यंत आले- 

डिसेंबरमध्ये डिलिवरी होणाऱ्या चांदीची किंमत 773 रुपयांनी कमी होऊन 59 हजार 100 रुपयांपर्यंत आले होते. तसेच मार्चमधील डिलिवरीच्या चांदीच्या किंमती 1290 रुपयांनी उतरुण 60 हजार 333 रुपयांवर बंद झाले होते. 

राजधानी दिल्लीमध्ये शुक्रवारी 10 ग्रॅम सोन्याचे दर 43 रुपयांनी कमी होऊन 48 हजार 142 रुपये झाले आहेत. याआधी गुरुवारी हाच दर 48 हजार 185 इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याचा दर 1810 डॉलर प्रति औंस इतका झाला आहे.

एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील सराफ बाजारात चांदी 36 रुपयांनी स्वस्त झाली आहे. चांदीचे प्रति किलोग्रॅम दर 59 हजार 250 रुपये इतके असून सोमवारी हाच दर 59 हजार 286 रुपये इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे प्रति औंस दर 23.29 डॉलर इतके आहेत.

संबंधित बातम्या