Gold Price: सोन्याचे भाव भिडले गगनाला

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम भारतीय बाजारातील सोन्याच्या दरांवर झालेला पाहायला मिळत आहे.
Gold Price Today | Gold Rate Today
Gold Price Today | Gold Rate Today Dainik Gomantak

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम भारतीय बाजारातील सोन्याच्या दरांवर झालेला पाहायला मिळत आहे. एमसीएक्सवर फ्युचर्स ट्रेडमध्ये सोन्याचा भाव 1.8 % वाढून 53, 000 प्रति 10 ग्रॅम झाला. ऑगस्ट 2020मध्ये भारतीय बाजारामध्ये सोन्याचे 56,200 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. जागतिक बाजारात, स्पॉट गोल्ड 1.5% वाढून 1,998.37 प्रति डॉलरवर पोहोचले, पूर्वी 2,000. 69 वरुन, 18 महिन्यातील सर्वोच्च वाढ होती. एमसीएक्सवर चांदी 1.5% ने वाढून 70173 रुपये प्रतिकिलो झाली आहे. कीबहुना, जागतिक तणावामुळे सर्वच वस्तूंच्या किंमती (Price) वाढत आहेत. यामुळे सोन्या-चांदीच्या किंमती देखील गगनाला भिडल्या आहेत. (Gold Price Today)

* सोने प्रति 10 ग्रॅम 60, 000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते

कच्च्या तेलाच्या किंमतीसह सोन्याच्या भावांमध्ये देखील प्रचंड वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरूच राहिले तर सोन्याच्या (Gold) दरात अधिक वाढ होऊ शकते असे मानले जाते. सोने लवकरच 60, 000 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी गाठू शकते असे तज्ञांचे मत आहे.

Gold Price Today | Gold Rate Today
SBI बॅंकेत अनेक पदांसाठी भरती चालू...

* सोने का महाग होत आहे?

जगभरात आधीचा महागाईचा भडका उडाला आहे. यात भर म्हणजे तेलाच्या किमती वाढल्यामुळे महागाई अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर विविध देशांच्या केंद्रीय बँका महागाई रोखण्यासाठी वीजदार वाढवू शकतात. यावेळी आरबीआयनेही (RBI) व्याजदर वाढवण्याचा निर्णय घ्यावा असे मानले जात आहे. यामुळे शेअर मार्केटमध्ये घसरण दिसू शकते, त्यानंतर गुंतवणूकदार आपली गुंतवणूक वाचवण्यासाठी सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतात. यामुळे सोन्याची मागणी वाढून त्याच्या किंमतीमध्ये वाढ होऊ शकते. जगभरातील शेअर मार्केटमध्ये (Share Market) मोठी घसरण सुरू असतांना, युद्धामुळे होणारा धोका टाळण्यासाठी गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com