BSNL: दररोज 3 जीबी डेटा, फ्री कॉलिंग, 90 दिवसांची एक्स्ट्रा वैलिडिटी ऑफर

BSNL: दररोज 3 जीबी डेटा, फ्री कॉलिंग, 90 दिवसांची एक्स्ट्रा वैलिडिटी ऑफर
BSNL

बीएसएनएल(BSNL) वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कंपनी आपले प्रमोशनल व्हाउचर PV -2399 एक्स्ट्रा वैलिडिटी ऑफर करीत आहे. विशेष प्रोफेशनल ऑफर अंतर्गत 2399 च्या व्हाउचरला 90 दिवसांची अतिरिक्त वैलिडिटी दिली जात आहे. पूर्वी हे व्हाउचर 365 दिवसांच्या वैलिडिटीसह येत होते परंतु आता वापरकर्त्यांना यात 455 दिवसांची वैलिडिटी मिळत आहे. कंपनीची ही ऑफर 23 मे 2021 पासून अंमलात आली आहे. 20 ऑगस्ट 2021 पर्यंत वापरकर्ते या उत्तम ऑफरचा फायदा घेऊ शकतात. बीएसएनएलने आपल्या ऑफरची माहिती आपल्या बीएसएनएलच्या ट्विटर हँडलवरून दिली.(Good news for BSNL users 3 GB data per day and 90 days extra validity in free calling plan)

PV -2399 चे फायदे
कंपनीच्या ट्विटनुसार हे व्हाउचर 455 दिवसांच्या वैधतेसह अनेक आकर्षक फायदे देत आहे. या ऑफरमधून रीचार्ज करणार्‍या वापरकर्त्यांना होम एलएसए (Home LSA)(लोकल सर्व्हिस एरिया) आणि नॅशनल रोमिंग मधील कोणत्याही नेटवर्कसाठी असीमित लोकल / एसटीडी कॉलिंग देण्यात येत आहे. राष्ट्रीय रोमिंग दरम्यान, वापरकर्त्यांना एमटीएनएलच्या मुंबई आणि दिल्लीतील नेटवर्कवर विनामूल्य कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे. 

या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरासाठी वापरकर्त्यांना दररोज 3 जीबी डेटा मिळतो. डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पिड 80 केबीपीएस असणार. या ऑफरत दररोज 100 मोफत एसएमएस देण्यात येणाऱ्या पीआरबीटी आणि ईआरओएस ना ची फ्री सबस्क्रिप्शनही अमर्यादित गाणे बदल पर्यायासह देण्यात येत आहे. या ऑफरव्यतिरिक्त कंपनीने 100 रुपयांच्या टॉप-अपवर 90 दिवसांपर्यंतचा पूर्ण टॉकटाइम जाहीर केला आहे. 

PV-1499 चे फायदे
कंपनीच्या वापर्कर्त्यांसाठी बीएसएनएलने 1499 रुपयांचे व्हाउचर बाजारात आणले आहे. 365 दिवसांच्या वैधतेसह या व्हाउचरमध्ये कंपनी 24 जीबी डेटा देत आहे. दररोज 100 विनामूल्य एसएमएस देखील या ऑफरमध्ये मिळणार आणि अमर्यादित कॉलिंगचा फायदा होणार आहे. 

मागील महिन्यात सुरू करण्यात आलेला 197 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
कंपनीने वापरकर्त्यांसाठी मागील महिन्यात 197 रुपयांचा प्रीपेड प्लॅन बाजारात आणला . या ऑफरत कंपनी 18 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 2 जीबी डेटा देत आहे. ऑफरच्या लाभ घेणाऱ्यांना जिंग म्युझिक अ‍ॅपवर 18 दिवसांसाठी विनामूल्य सब्सक्रिप्शन देखील मिळते. हा प्लॅन 180 दिवस सक्रिय राहणार आहे. अशा परिस्थितीत, त्या वापरकर्त्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे ज्यांना कमी पैशात जास्त काळ हा नंबर अ‍ॅक्टिव ठेवायचा आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com