खुशखबर! नव्या आर्थिक वर्षात जीएसटीचं विक्रमी कलेक्शन

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 1 मे 2021

नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात जीएसटीचं विक्रमी कलेक्शन झालं आहे.

देशात कोरोना संसर्गामुळे (Corona Second Wave) अनेक राज्यांमध्ये कडक लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे  राज्यांमध्ये रोजगार आणि उद्योग धंद्यावर चांगलाच परिणाम झाला आहे. असं असलं तरी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात जीएसटीचं (GST) विक्रमी कलेक्शन झालं आहे. सलग सातव्या महिन्यामध्ये 1 लाख कोटीच्या वर जीएसटीचं कलेक्शन झालं आहे. ही माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाने (Ministry of Finance) सोशल मिडियावरील ट्विटर आकाऊंटवरुन दिली आहे. 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यापासूनचं हे सर्वात विक्रमी उत्पन्न आहे. त्यामुळे मागील सात महिन्यामध्ये एक लाख सात कोटींचा जीएसटी मिळाल्यामुळे केंद्र सरकारला मोठा आर्थिक फायदा झाला आहे. (Good news Record collection of GST in the new financial year)

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी वाईट बातमी; GDP घटणार

एप्रिल 2021 या महिन्यात एकूण 1 लाख 41 हजार 384 कोटींचा जीएसटी मिळाला आहे. देशात जीएसटी लागू झाल्यापासून आत्तापर्यंतचा सर्वाधिक GST मिळाला आहे. यामध्ये केंद्राचा जीएसटी 27,837 कोटी, राज्यांचा 35,621 कोटी तर एकीकृत 68,481 त्यात उपकर  9445 कोटींचा आहे.  मागच्या मार्च महिन्यामध्ये 1 लाख 23 हजार 902 कोटींचा जीएसटी वसूल करण्यात आला होता.

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्यानंतर जीएसटीच्या वसूलीत विक्रमी अशी वाढ झाली. मात्र एप्रिल महिन्यामध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे.
 

संबंधित बातम्या