खुशखबर! लाखो केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळणार महागाई भत्त्याचे तीन हप्ते

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 मार्च 2021

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा देणारी बातमी सरकारने दिली आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना 1 जुलै 2021 पासून संपूर्ण महागाई भत्ता देण्यात येईल

नवी दिल्ली: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा देणारी बातमी सरकारने दिली आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना 1 जुलै 2021 पासून संपूर्ण महागाई भत्ता देण्यात येईल आणि उर्वरित महागाई भत्ता देखील पूर्ववत केला जाईल. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत ही माहिती दिली. 

केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी संसदेत सांगितले की, केंद्रीय कर्मचार्‍यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना जुलै 2021 मध्ये महागाई थकबाकी भत्ताचे तीन हप्ते मिळतील. कोरोना संकटामुळे सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्याचे तीन हप्ते रोखले होते, त्यात एक जानेवारी 2020, एक जुलै 2021 आणि एक जानेवारी 2021 चा हप्ता समाविष्ट आहे. 

‘’भाजपने हिंदुत्वाचा खेळ माझ्याबरोबर खेळू नये’’ 

सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होईल, अशी माहिती अर्थ राज्यमंत्र्यांनी दिली आहे. राज्यसभेत लेखी उत्तरात अनुराग ठाकूर म्हणाले की, भविष्यात जेव्हा जेव्हा 1 जुलै 2021 साठी महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला जाईल, तेव्हा उर्वरित तीन हप्तेही पूर्ववत केले जातील. 

उत्तराखंडमध्ये राजकिय़ उलथापालथ; त्रिवेंद्रसिंह रावत यांनी दिला राजीनामा 

अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत माहिती दिली की, सरकारने महागाई भत्ता तीन हप्ते न देऊन सुमारे 37,530.08 कोटी रुपयांची बचत केली. सध्या केंद्रीय कर्मचार्‍यांना त्यांच्या मूलभूत पगाराच्या 17% पर्यंत महागाई भत्ता मिळतो. 

कोण होणार एअर इंडियाचा तारणहार? बड्या कंपन्यांची माघार 

जुलै 2019 पासून नियोजित केले आहे आणि जानेवारी 2020 मध्ये त्यात दुरुस्ती करण्यात येणार होती. मात्र, कोरोनामुळे, त्यात सुधारणा केली जाऊ शकली नाही. गेल्या वर्षी केंद्रीय मंत्रिमंडळाने डीएला चार टक्क्यांवरून 21 टक्क्यांपर्यंत वाढ देण्यास मान्यता दिली होती, परंतु अद्याप ती वाढविण्यात आलेली नाही. 

 

 

संबंधित बातम्या