"गुगल'कडून वोडाफोन-आयडियाला रसद

Dainik Gomantak
शनिवार, 30 मे 2020

831 कोटी रुपयांची गुंतवणूक; समभाग 30 टक्‍क्‍यांनी वधारले

मुंबई

काही वर्षांपासून प्रचंड तोट्यात असलेल्या वोडाफोन-आयडिया कंपनीत "गुगल' 831 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे शेअर बाजारात वोडाफोन-आयडियाचे समभाग 25 ते 30 टक्‍क्‍यांनी वधारले आहेत.
अल्फाबेट ही "गुगल'ची होल्डिंग कंपनी वोडाफोन-आयडिया कंपनीत 5 टक्के भागीदारी खरेदी करणार आहे. गुंतवणुकीची प्रक्रिया सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. लवकरच या निर्णयाची घोषणा होणार असल्याचे जाणकार सांगतात. यापूर्वी गुगल अल्फाबेटने रिलायन्स समूहाच्या जिओ कंपनीत काही टक्के भागीदारी खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता; परंतु त्या व्यवहारात फेसबुकने बाजी मारली. तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीची कंपनी असलेल्या अल्फाबेटचे बाजार मूल्य तब्बल 968 अब्ज डॉलर आहे. 
यापूर्वी काही परदेशी कंपन्यांनी रिलायन्स जिओमध्ये जवळपास 78,562 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. फेसबुकने 5.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून जिओमधील 9.99 टक्के भागीदारी खरेदी केली आहे.

जिओचा दबदबा 
देशातील टेलिकॉम क्षेत्रात एकेकाळी जिओ, वोडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल यांच्यात तगडी स्पर्धा होती; परंतु अल्पावधीतच जिओने बाजारात दबदबा निर्माण केला. सध्या जिओ आणि एअरटेल यांच्यात स्पर्धा सुरू असून, वोडाफोन-आयडिया बाहेर फेकली गेली आहे. वोडाफोनकडे टेलिकॉम मंत्रालयाची 58 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे

संबंधित बातम्या