Google layoff 2022: Twitter अन् Meta नंतर आता गुगलही 10 हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ !

Layoff Trend 2022: ट्विटर, फेसबुक आणि अ‍ॅमेझॉननंतर आता गुगलनेही कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार केला आहे.
Google
Google Dainik Gomantak

Google layoff 2022: ट्विटर, फेसबुक आणि अ‍ॅमेझॉननंतर आता गुगलनेही कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार केला आहे. जगभरात आलेल्या मंदीमुळे अनेक कंपन्यांनी आतापर्यंत कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले आहे. रिपोर्टनुसार, गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटही आता काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे.

10,000 कर्मचारी बाहेर जातील

एका रिपोर्टनुसार, गुगलची (Google) मूळ कंपनी अल्फाबेटही आता काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. कंपनीने 10,000 कर्मचाऱ्यांची (Employees) यादी तयार केली आहे. मात्र गुगलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी हे प्रमाण केवळ 6 टक्के आहे.

Google
Google ने खास डूडल बनवून साजरा केला 'FIFA World Cup 2022' चा प्रारंभ

एक विशेष परफॉर्मेंस रेटिंग प्रणाली तयार केली गेली

द इन्फॉर्मेशनच्या रिपोर्टनुसार, गुगलने आपल्या कर्मचार्‍यांचा परफॉर्मेंस पाहण्यासाठी एक विशेष परफॉर्मेंस रेटिंग प्रणाली तयार केली आहे, ज्या अंतर्गत कर्मचार्‍यांच्या परफॉर्मेंसची गणना केली जाईल. या प्रणालीच्या आधारे कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात येणार आहे.

व्यवस्थापक बोनस आणि स्टॉक देण्यासही नकार देऊ शकतो

नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही रेटिंग प्रणाली कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापकांना उपलब्ध होईल. यानंतर, व्यवस्थापक त्यानुसार रेटिंग देऊन काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवतील. यासोबतच व्यवस्थापक त्याला बोनस आणि स्टॉक देण्यासही नकार देऊ शकतो.

Google
Google Play UPI Autopay: Online पेमेंट करणे आणखी होईल सोपे, गुगल-पे ने लॉंच केले 'हे' नवे फिचर

आता एकूण कर्मचारी किती आहेत?

याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. कंपनीत सध्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 1,87,000 आहे. त्याचवेळी, कंपनीने सप्टेंबर तिमाहीत $ 13.9 अब्ज निव्वळ नफा कमावला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com