Google Play Store Virus : गुगल प्ले स्टोअरवर पुन्हा SharkBot व्हायरसची एंट्री, हे अॅप्स ताबडतोब करा डिलीट

काही वेळा त्यावरील अॅपसोबत मालवेअरही डाउनलोड केले जातात.
Google Play Store Virus
Google Play Store VirusDainik Gomantak

अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी गुगल प्ले स्टोअर अॅप डाउनलोड करण्यासाठी सर्वात सुरक्षित मानले जाते. परंतु, काही वेळा त्यावरील अॅपसोबत मालवेअरही डाउनलोड केले जातात. यामुळे, ते डाउनलोड केलेल्या वापरकर्त्यांची अनेक माहिती स्कॅमरपर्यंत पोहोचण्याचा धोका असतो.

Google Play Store Virus
Goa Petrol Price|गोव्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले? जाणून घ्या, आज राज्यात इंधनाचे दर काय

शार्कबॉट व्हायरसचा धोका

आता पुन्हा एकदा अशाच एका व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. गुगल प्ले स्टोअरवरील दोन अॅप्समध्ये SharkBot मालवेअर दिसल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही हे अॅप्स फोनमध्ये डाउनलोड केले असतील तर ते त्वरित हटवा.

हे अॅप्स 60 हजारांहून अधिक वेळा इन्स्टॉल करण्यात आले. जेव्हा हे अॅप्स Google Play Store वर पुनरावलोकनासाठी सबमिट केले गेले तेव्हा त्यात कोणतेही दुर्भावनापूर्ण कोड नव्हते. पण, हे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर युजर जेव्हा ते ओपन करतात, तेव्हा एका अपडेटद्वारे त्यात शार्कबॉट मालवेअर इन्स्टॉल झाला होता. असे सांगण्यात आले आहे की मिस्टर फोन क्लीनर आणि किल्हवी मोबाईल सिक्युरिटी हे दोन्ही दुर्भावनापूर्ण अॅप्स आहेत, हे अॅप्स 60 हजाराहून अधिक वेळा इन्स्टॉल करण्यात आले होते.

तथापि, एक चांगली गोष्ट म्हणजे दोन्ही अॅप्स Google Play Store वरून काढून टाकण्यात आले आहेत. पण, ज्यांनी हे अॅप्स इन्स्टॉल केले आहेत त्यांना आता धोका आहे. यामुळे त्यांना त्यांच्या फोनमधूनही हे अॅप्स डिलीट करावे लागतील. हा मालवेअर लोकांचे बँकिंग तपशील चोरतो. मालवेअर विश्लेषक क्लीफीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शार्कबॉटबद्दल सांगितले होते. ही एक इटालियन फसवणूक व्यवस्थापन आणि प्रतिबंधक कंपनी आहे. NCC ग्रुपने मार्च 2022 मध्ये Google Play Store मध्ये प्रथम मालवेअर शोधला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com