भारतात आजपासून काय नवीन बदल झाले?; जाणून घ्या...

गोमंतक ऑनलाईन टीम
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

सामान्यांसाठी महत्वाच्या असणाऱ्या या नियमांमध्ये कोरोना मॉनिटरिंग, कोरोना प्रतिबंध आणि पाळायची काही मार्गदर्शत तत्वांबरोबरच देशात बँकिंग नियमांमधील बदल समाविष्ट करण्यात आले आहेत. 
 

नवी दिल्ली- कोरोनामुळे आजही देशातील काही सुविधा पूर्णपणे खंडित आहेत. मात्र, आजच्या तारखेपासून काही महत्वपूर्ण बदल देशात लागू झाले आहेत. सामान्यांसाठी महत्वाच्या असणाऱ्या या नियमांमध्ये कोरोना मॉनिटरिंग, कोरोना प्रतिबंध आणि पाळायची काही मार्गदर्शत तत्वांबरोबरच देशात बँकिंग नियमांमधील बदल समाविष्ट करण्यात आले आहेत. 
 
कोरोनावरील नवीन मार्गदर्शक तत्वे-

नवीन मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करत कोरोनाचा प्रसार कमी करण्याचे आव्हान सरकारसमोर असेल. यात गर्दी न करणे, एसओपीचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांनी जिल्ह्यातील प्रशासनाकरवी ग्रामीण भागात लक्ष देणे, रूग्ण जास्त असलेल्या भागात फक्त अत्यावश्यक सेवेला परवानगी देण्यात येणार आहे. सार्वजनिक तसेच खासगी जागी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करणे, अशी नियमावली जाहीर करण्यात करण्यात आली आहे.      

 आरटीजीएस सुविधा आता चोवीस तास- 

 रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) सुविधा 1 डिसेंबरपासून 24 तास आणि आठवड्याचे सात दिवस उपलब्ध असणार आहे. ग्राहकांना आरटीजीएसच्या माध्यमातून वर्षातील 365 दिवस कधीही पैशांचा व्यवहार करता येणार आहे. आरटीजीएस प्रणाली सध्या महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार वगळता आठवड्याच्या सुट्ट्यासोडून सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरु आहे.

'पीएनबी एटीएम'मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्येही बदल-  

आजपासून PNB 2.0 (PNB, eOBC, eUNI) वन टाइम पासवर्ड (OTP) आधारित रोख काढण्याची सुविधा सुरू होणार आहे. 1 ते 8 डिसेंबर या कालावधीत पीएनबी 2.0 एटीएममधून एकावेळी 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम काढायचे असतील तर आता त्यासाठी ओटीपी टाकणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे आता पीएनबी ग्राहकांना रात्रीच्या वेळेत 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी ओटीपीची गरज लागणार आहे त्यामुळे आता पैसे काढताना सोबत मोबाईल असणे गरजचे असणार आहे.

नवी रेल्वे सुरु-

मुंबई-हावडाडेली सुपरफास्ट ट्रेन आज 1 डिसेंबरपासून पुन्हा सुरू होत आहे. मुंबई-हावडा ट्रेन जुन्या वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहे. जबलपूर-नागपूर विशेष गाडीही 1 डिसेंबरपासून सुरू होत आहे. लॉकडाउन झाल्यापासून या ट्रेनची सेवा बंद करण्यात आली होती. रेवा स्पेशल आणि सिंगरौली स्पेशल ट्रेनही 1 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. याशिवाय झेलम एक्स्प्रेस आणि पंजाब मेलही पुन्हा धावणार आहेत.

एलपीजीबाबत काही- 

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किंमती बदलत असतात. पण मागील सहा महिन्यांत LPGच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. डिसेंबरमध्ये एलपीजीच्या किंमती वाढतात की कमी होतील हे पाहावे लागेल.

संबंधित बातम्या