सुकन्येसाठी पोस्टात खास स्क्रीम; ₹ 250 भरुन खाते उघडा 15 लाख मिळवा!

सुकन्या समृद्धी योजनेवर सरकार पूर्वीप्रमाणेच वार्षिक 7.6 टक्के दराने व्याज द्यायला चालू करणार आहे.
Sukanya Samriddhi Account
Sukanya Samriddhi AccountDainik Gomantak

सुकन्या समृद्धी योजनेसारख्या (Sukanya Samriddhi Account) छोट्या बचत योजनांसाठी सरकारने पुन्हा एकदा व्याजदर स्थिर ठेवले आहेत, सुकन्या समृद्धी योजनेवर सरकार पूर्वीप्रमाणेच वार्षिक 7.6 टक्के दराने व्याज द्यायला चालू करणार आहे. सरकारच्या निर्णयानंतर येत्या एप्रिल-जून तिमाहीसाठी हेच व्याजदर कायम राहणार आहेत. म्हणजेच, जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे, तुम्हाला पुढील तिमाहीपर्यंत अधिक व्याज मिळत राहणार. अशा परिस्थितीत, नवीन आर्थिक वर्षात, तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर गुंतवणूक करण्यास सुरू करू शकता. (government paying interest at 7 point 6 percent per annum on Sukanya Samriddhi Yojana as before)

Sukanya Samriddhi Account
रेल्वे चांगली करण्यावर भर, खाजगीकरण नाही: रेल्वेमंत्री

सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही मुलींसाठी सुरू केलेली एक छोटी सरकारी ठेव योजना आहे. सुकन्या समृद्धी योजना खाते या योजनेअंतर्गत 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीचे पालक उघडू शकतात. सरकारच्या या योजनेत तुम्हाला उत्तम परतावा मिळवण्याची संधी तर मिळणार नाही, पण तुम्ही त्यातून कर वाचवू शकता. चला या योजनेबद्दल सर्व काही जाणून घेऊयात...

SSY योजना म्हणजे काय?

या योजनेअंतर्गत, तुम्ही किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये जमा करू शकता. हे खाते उघडून तुम्हाला तुमच्या मुलीचे शिक्षण आणि पुढील भविष्याच्या खर्चातून खूप आराम मिळतो. यामध्ये एका मुलीच्या नावाने एकच खाते उघडले जाऊ शकते. जर दोन मुली असतील तर दोघांच्या नावे स्वतंत्र खाते उघडावे लागते.

Sukanya Samriddhi Account
लोकांच्या आवडत्या स्प्लेंडरची किंमत वाढली, आता मोजावे लागणार एवढे पैसे

खाते कुठे उघडायचे?

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा व्यावसायिक शाखेच्या अधिकृत शाखेत उघडले जाऊ शकते. या योजनेंतर्गत, 10 वर्षापूर्वी मुलीचा जन्म झाल्यानंतर किमान 250 रुपये ठेवीसह खाते उघडले जाते.

हे कागदपत्र द्या?

चालू आर्थिक वर्षात सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात. खाते उघडण्यासाठी, तुम्हाला तुमच्या मुलीचे जन्म प्रमाणपत्र पोस्ट ऑफिस (Post Office) किंवा बँकेत (Bank) फॉर्मसह जमा करा. याशिवाय मुलाचे आणि पालकांचे ओळखपत्र जसे की पॅनकार्ड, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट जमा करावे लागेल.

Sukanya Samriddhi Account
प्रतीक्षा संपली! जुलै-सप्टेंबरमध्ये 'जेट एअरवेज' घेणार भरारी

हे खाते कधी परिपक्व होईल?

सुकन्या समृद्धी खाते खाते उघडण्याच्या तारखेपासून 21 वर्षांनी किंवा लग्नाच्या वेळी (लग्नाच्या तारखेच्या 1 महिना आधी किंवा तीन महिन्यांनंतर) मुलगी 18 वर्षांची झाल्यावर खाते परिपक्व होते. सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के एवढे व्याज आहे.

आम्ही तुम्हाला 15 लाखांचा कसा फायदा ते सांगतो,

जर तुम्ही या योजनेत दरमहा 3000 रुपये गुंतवलेत, म्हणजेच 14 वर्षांनी, तुम्हाला वार्षिक 7.6 टक्के चक्रवाढ दराने 9,11,574 रुपये मिळणार. 21 वर्षांच्या मुदतीनंतर, ही रक्कम सुमारे 15,22,221 रुपये एवढी असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com