सरकार सोमवारपासून 21 सप्टेंबरपर्यंत देणार स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 15 मे 2021

सोने-चांदीच्या किंमतीत अजुनही चढउतार होताना दिसत आहे. सध्या कोरोनाचं संकट असतानाच दरांमध्ये सातत्याने बदल होत आहे. अशा परिस्थिती सोन्यामध्ये गुंतवणूकीचा विचार करत  असाल तर तुमच्यासाठी स्वस्तात सोने खरेदीची संधी आहे.

सोने-चांदीच्या(उदत्) किंमतीत अजुनही चढउतार होताना दिसत आहे. सध्या कोरोनाचं संकट असतानाच दरांमध्ये सातत्याने बदल होत आहे. अशा परिस्थिती सोन्यामध्ये गुंतवणूकीचा(Investment) विचार करत  असाल तर तुमच्यासाठी स्वस्तात सोने खरेदीची संधी आहे. सरकारकडून(government) 2021-22 या आर्थिक वर्षासाठी सॉवरेन गोल्ड बाँडची(Sovereign Gold Bonds) पहिल्या मालिकेतील सोडत सोमवारी 17 मे रोजी आहे. यामध्ये बाँडची किंमत ही प्रति ग्रॅम 4 हजार 777 रुपये इतकी असणार आहे. बाजारभावापेक्षा ही किंमत कमी असल्यानं गुंतवणूक फायद्याची ठरणार आहे.(The government is releasing the first series of Sovereign Gold Bonds for the financial year 2021 22 on Monday 17th May)

सॉवरेन गोल्ड बाँड सेकंड सीरिजसाठी सब्सक्रिप्शन 24 मे ते 28 मे दरम्यान सुरू होणार आहे. या कालावधीत सब्सक्राइब करणाऱ्यांना 1 जून रोजी गोल्ड बाँड दिले जातील. यानंतर, तिसर्‍या मालिकेसाठीची सोडत 31 मे ते 4 जून, आणि चौथ्या मालिकेची 12 जुलै ते 16 जुलै पर्यंत उघडणार आहे. तिसर्‍या मालिकेसाठीची तारीख 8 जून आहे, तर चौथ्या मालिकेसाठी बॉण्ड इश्यूची तारीख 20 जुलै असणार आहे.

ऑनलाइन शिक्षणासाठी Lava Z2 Max लाँच; किंमत फक्त... 

सरकार वेळोवेळी बाँड जारी करते
सोन्यात गुंतवणूक आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी सरकार वेळोवेळी सॉवरेन गोल्ड बाँडची मालिका जारी करते. याअंतर्गत गुंतवणूकदारांना बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सोने मिळते. तसेच त्यामध्ये सुरक्षिततेची पूर्ण सरकारी हमी असते. हा बाँड खरेदी करण्यासाठी ग्राहकांचे केवायसी(KYC) निकष बाजारपेठेतून सोने खरेदी करण्यासाठी असतात तसेच असतील. सरकारने सॉवरेन गोल्ड बाँड योजना नोव्हेंबर 2015मध्ये सुरू केली होती.

ऑनलाइन खरेदी केल्यास आपल्याला अधिक सूट मिळेल
गेल्या काही वर्षांपासून सरकार ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सतत नवीन प्रयत्न करत आहे. याअंतर्गत, सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये ऑनलाइन खरेदी करण्यासाठी सरकारने प्रति दहा ग्रॅम 50 रुपयांची अतिरिक्त सूटदेखील दिली आहे. म्हणजेच, जर तुम्ही ऑनलाइन गुंतवणूक केली तर तुम्हाला प्रत्येक दहा ग्रॅमसाठी 50 रुपये कमी द्यावे लागतील. अर्थ मंत्रालयाच्या मते, सोन्याच्या बाँडची किंमत इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडने जारी केलेल्या किंमतीच्या सामान्य सरासरी किंमतीवर असेल. गुंतवणूकीच्या कालावधीआधी आठवड्याच्या शेवटच्या तीन व्यावसायिक दिवसांमध्ये ही किंमत 99.9 शुद्धतेच्या सोन्याच्या सरासरी किंमती असेल.

रूग्णालयात दोन लाख भरताय तर मग द्यावं लागेल ओळखपत्र

4 किलो पर्यंत खरेदी करू शकता सोने
या सरकारी बाँडमध्ये भारतातील कोणताही नागरिक 4 किलो पर्यंत सोन्याची गुंतवणूक करू शकतो. ही गुंतवणूक बॉंडच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला थेट सोने हातात मिळणार नाही. तसंच यामध्ये ट्रस्ट आणि इतर संस्थांसाठी खरेदीची कमाल मर्यादा 20 किलो इतकी आहे.

संबंधित बातम्या