Air India नंतर आता सरकार या 4 उपकंपन्या विकणार, ही आहे संपूर्ण योजना

Central Government: एअर इंडिया या विमान कंपनीनंतर आता केंद्र सरकार इतर उपकंपन्याही विकण्याची तयारी करत आहे.
Air India
Air IndiaDainik Gomantak

Air India: एअर इंडिया या विमान कंपनीनंतर आता केंद्र सरकार इतर उपकंपन्याही विकण्याची तयारी करत आहे. एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL), एअरलाइन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड (AASL) किंवा Alliance Air, Air India Engineering Services Limited (AIESL) आणि Hotel Corporation of India Limited (HCI) या चार कंपन्या आहेत. माहितीसाठी, या कंपन्यांमध्ये सरकारची हिस्सेदारी आहे.

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, प्रस्तावित विक्रीवर काम सुरु झाले आहे. बर्ड ग्रुप, सेलेबी एव्हिएशन आणि आय स्क्वेअर कॅपिटल हे संभाव्य बोलीदार आहेत. बर्ड ग्रुप, सेलेबी एव्हिएशन आणि आय स्क्वेअर कॅपिटलने एआयएटीएसएल घेण्यास स्वारस्य दाखवल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

Air India
Air India ची नवी पॉलिसी, वयाच्या 65 वर्षापर्यंत वैमानिकांना घेता येणार गगनभरारी

बोलीदारांचे तपशील: बर्ड ग्रुप ही दिल्लीतील सर्वात मोठ्या ग्राउंड हँडलिंग कंपन्यांपैकी एक आहे. त्याच वेळी, सेलेबी एव्हिएशन होल्डिंग ही तुर्कीमधील ग्राउंड हँडलिंग कंपनी आहे. आय स्क्वेअर कॅपिटल ही खाजगी इक्विटी फर्म आहे. केंद्र सरकारने (Central Government) या वर्षाच्या सुरुवातीला एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे (Tata Group) हस्तांतरित केली होती.

विमानाचा ताफा वाढवणार: दरम्यान, एअर इंडियाने माहिती दिली आहे की, कंपनी आपल्या ताफ्याचा विस्तार करणार आहे. एअर इंडियाने (Air India) सांगितले की, आम्ही 30 नवीन विमाने ताफ्यात समाविष्ट करणार आहोत, ज्यात पाच वाइड-बॉडी बोईंग विमानांचा समावेश आहे. माहितीनुसार, एअरलाइनने पुढील 15 महिन्यांत पाच वाइड-बॉडी बोईंग विमाने आणि 25-बॉडी एअरबस विमाने समाविष्ट करण्यासाठी लीज आणि इरादा पत्रांवर स्वाक्षरी केली आहे.

Air India
AIR INDIA: एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत नोकरीच्या संधी

दुसरीकडे, लीजवर घेतलेल्या विमानात 21 Airbus A320 Neos, चार Airbus A321 Neos आणि पाच Boeing B777-200LR चा समावेश आहे. टाटा समूहाने यावर्षी एअर इंडियाचे अधिग्रहण केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com