अटल टनलमधून जाणाऱ्या वाहनांवर आता आकारला जाणार 'ग्रीन टॅक्स'
Atal TunnelDainik Gomantak

अटल टनलमधून जाणाऱ्या वाहनांवर आता आकारला जाणार 'ग्रीन टॅक्स'

अटल बोगद्यातून (Atal Tunnel) जाण्यासाठी, दुचाकी वाहकांना 50 रुपये, कार 200 रुपये, एसयूव्ही आणि एमयूव्ही 300 रुपये आणि बस-ट्रक 500 रुपये ग्रीन टॅक्स म्हणून भरावे लागतील.

हिमालयातील (Himalaya) पीर पंजाल (Pir Panjal) रांगेतील लेह-मनाली महामार्गावर बांधलेल्या अटल टनलमधून (Atal Tunnel) जाणाऱ्या वाहनांवर आता ग्रीन टॅक्स (Green Tax) आकारण्यात येणार आहे. अटल टनल हिमाचल प्रदेशात 9.02 किमी लांबीचा अत्याधुनिक बोगदा आहे. या बोगद्यातून जाणाऱ्या सर्व पर्यटकांना ग्रीन टॅक्स भरावा लागेल, जरी तुम्ही मोटारसायकल चालवत असाल तरीही. अटल बोगद्यातून जाण्यासाठी, दुचाकी वाहकांना 50 रुपये, कार 200 रुपये, एसयूव्ही आणि एमयूव्ही 300 रुपये आणि बस-ट्रक 500 रुपये ग्रीन टॅक्स म्हणून भरावे लागतील.

फक्त या वाहनांना सूट मिळणार

अहवालांनुसार, केवळ परदेशी पर्यटक वाहनेच नव्हे तर लाहौल, किश्तवाड (Kishtwar) आणि पंगी येथून जाणाऱ्या वाहनांनाही अटल बोगद्यातून जाण्यासाठी कर भरावा लागणार आहे. मात्र, दैनंदिन कामाशी संबंधित वाहनांना लाहौल प्रवास करण्यासाठी कर भरावा लागणार नाही. ग्रीन टॅक्स टाळण्यासाठी या वाहनांना स्थानिक प्रशासनाकडून विशेष पास घ्यावा लागणार आहे, त्यानंतरच त्यांना ग्रीन टॅक्स भरावा लागणार नाही. ग्रीन टॅक्स विशेष क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून सिसू, लाहौल येथे गोळा केला जाईल.

Atal Tunnel
Zomato ने Grocery डिलीवरी सर्विस बंद करण्याचा घेतला निर्णय, जाणून घ्या कारण?

ग्रीन टॅक्सने विकास कामे केली जातील

अटल टनलमधून जाण्यासाठी भरलेला ग्रीन टॅक्स फक्त पर्यटकांवर खर्च करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे. तसेच मनाली-लेह महामार्गावरुन गोळा केलेल्या ग्रीन टॅक्समधून पर्यटकांसाठी पायाभूत विकास सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. याशिवाय आसपासच्या गावांमध्येही या पैशातून विकास कामे केली जातील. अटल टनल सुरु झाल्यापासून येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

Atal Tunnel
योजनेचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटल बॅंकिंग आवश्यक: सीतारामन

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी गेल्या वर्षी अटल टनलचे उद्घाटन केले. या टनलचे नाव आधी रोहतांग टनल असे निश्चित करण्यात आले होते, परंतु नंतर त्याचे नामकरण माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरुन करण्यात आले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, 10 हजार फूट उंचीवर बांधलेला हा टनल जगातील सर्वात लांब टनल आहे. टनल सर्व सामान्यांसाठी खुला झाल्यापासून मनाली आणि लेहमधील अंतर 46 किमीने कमी झाले आहे. पूर्वी या मार्गावर तेच 46 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 4 ते 5 तास लागत असे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com