सप्टेंबरमध्ये देशात विक्रमी GST कलेक्शन, आकडा 1.17 लाख कोटींच्या पार

जीएसटी संकलन (GST Collection) गेल्या वर्षी म्हणजेच सप्टेंबर 2020 च्या तुलनेत 23 टक्क्यांनी वाढून 1,17,010 लाख कोटी रुपये झाले आहे.
सप्टेंबरमध्ये देशात विक्रमी GST कलेक्शन, आकडा 1.17 लाख कोटींच्या पार
GST Collection on high in September month says finance ministry Dainik Gomantak

ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये (GST Collection) सरकारचे कर उत्पन्न वाढले आहे. सप्टेंबरमधील जीएसटी (GST) संकलन ऑगस्टच्या तुलनेत 1.12 लाख कोटी रुपयांवरून 1.17 लाख कोटी रुपये झाले आहे. सरकारने सांगितले की, जीएसटी संकलन गेल्या वर्षी म्हणजेच सप्टेंबर 2020 च्या तुलनेत 23 टक्क्यांनी वाढून 1,17,010 लाख कोटी रुपये झाले आहे.(GST Collection on high in September month says finance ministry)

सलग तिसऱ्या महिन्यात जीएसटी संकलनाने एक लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे . सरकारने नियमित सेटलमेंट म्हणून CGST ला 28,812 कोटी रुपये आणि IGST कडून SGST ला 24,140 कोटी रुपये सेटल केले आहेत. अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, सप्टेंबरमध्ये भारताचा वस्तू आणि सेवा कर संकलन सलग तिसऱ्या महिन्यात 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त राहिला आहे.

सप्टेंबर 2021 महिन्यातील महसूल सप्टेंबर 2020 मध्ये जीएसटीच्या उत्पन्नापेक्षा 23 टक्के अधिक आहे. सप्टेंबर महिन्यात आयात केलेल्या उत्पादनांमधून संकलन सप्टेंबर दरम्यान, मालाच्या आयातीतून मिळणारा महसूल 30 टक्के जास्त होता आणि घरगुती व्यवहारांमधून मिळणारा महसूल संबंधित स्त्रोतांच्या उत्पन्नापेक्षा 20 टक्के अधिक होता.

 GST Collection on high in September month says finance ministry
Air India साठी टाटाची सर्वात मोठी बोली, कंपनीची मालकी पुन्हा टाटांकडे ?

यापूर्वी ऑगस्ट 2021 मध्ये सरकारचे वस्तू आणि सेवा (जीएसटी) संकलन 1,12,020 कोटी रुपये होते. ही आकडेवारी दर्शवते की अर्थव्यवस्था पुन्हा एकदा वेगाने रुळावर येत आहे. आर्थिक वाढीबरोबरच करचोरीविरोधी उपक्रम, विशेषत: बोगस बिलांवर कारवाई करणे, जीएसटी संकलनात वाढ होण्यास हातभार लावला. वर्षाचा उत्तरार्धात महसूल सकारात्मक प्रवृत्ती आणि उच्च महसूल पोस्ट करणे अपेक्षित आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com