जून महिन्यात GST Collection 1 लाख कोटींच्या वर

विशेष म्हणजे जुलै 2020 मध्ये जीएसटी संकलन(GST Collection) 87,422 कोटी होते.
GST Collection over Rs 1 lakh crore in June
GST Collection over Rs 1 lakh crore in JuneDainik Gomantak

जुलै महिन्यात जीएसटी(GST) संकलनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे(GST Collection).कारण जुलै महिन्यात 1 लाख 16 हजार 393 कोटी वस्तू आणि सेवा करातून सरकारी तिजोरीत आले आहेत. जुलै 2020 च्या तुलनेत यावर्षी 33 टक्क्यांनी वाढ झाली आहे.हे. जुलै 2020 मध्ये जीएसटी संकलन 87,422 कोटी होते. यामध्ये CGST 16,147 कोटी, SGST 21,418 कोटी तर IGST 42,592 कोटी इतके होते.(GST Collection over Rs 1 lakh crore in June)

विशेष म्हणजे जुलै 2020 मध्ये जीएसटी संकलन 87,422 कोटी होते. परंतु 2021 च्या जीएसटी संकलनात 33% वाढीसह, राज्य जीएसटी (एसजीएसटी) 28541 कोटी, केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) 22197 कोटी आणि आयजीएसटी 57864 कोटी आहे. आयजीएसटी मध्ये 27,900 कोटी वस्तू आयातीतून आले आहेत. 7,790 कोटी सेस मधून आले आहेत , त्यापैकी 815 कोटी आयात मालावरील सेस मधून आले आहेत. जीएसटीचे हे कलेक्शन 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान जीएसटीआर -3 बी फाइलिंगद्वारे झाले आहे. या व्यतिरिक्त, या काळात आयात केलेल्या वस्तूंवर गोळा केलेला IGST आणि उपकर देखील यात समाविष्ट करण्यात आला आहे.

GST Collection over Rs 1 lakh crore in June
RBI चा ATM वापराबाबत नवीन नियम,थेट ग्राहकांच्या खिशाला कात्री

विशेष बाब म्हणजे, सलग आठ महिने, जीएसटी कलेक्शनने एक लाख कोटी ओलांडल्या नंतर जून महिन्यात मात्र हेच कलेक्शन 92,849 कोटींसह ते एक लाख कोटीवर आले होते. यामध्ये 16,424 कोटी CGST, 20,397 कोटी SGST आणि 49,079 कोटी IGST कडून आले होते.

खरं तर, जूनमध्ये जीएसटी संकलनात घट झाली होती कारण एप्रिल-मेमध्ये देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सावटाखाली होता.मुळे, स्थानिक पातळीवर जवळजवळ संपूर्ण देशात लॉकडाऊन होते. जुलैमध्ये कोरोनापासून आराम मिळताच जीएसटी संकलन देखील वाढले आहे. हे स्पष्टपणे दर्शवते की अर्थव्यवस्थेला पुन्हा गती मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com