राजीनामा दिल्यानंतरही भरावा लागेल जीएसटी; सरकारचा असाही अजब नियम 

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

कोणत्याही कंपनीत काम करत असताना राजीनामा दिल्यानंतर नोटीस पिरेड म्हणून पुढील काही दिवस काम करावे लागते. हा नोटीस पिरेड काही ठिकाणी महिन्याभराचा, तीन महिन्याचा किंवा सहा महिने कालावधीचा असतो. मात्र राजीनामा दिल्यानंतर अनेकजण हा नोटीस पिरेड पूर्ण न करताच कंपनी सोडतात. परंतु आता हा नोटीस पिरेड पूर्ण न करताच नोकरी सोडल्यास कर्मचाऱ्यांना फटका बसू शकतो.

अहमदाबाद - कोणत्याही कंपनीत काम करत असताना राजीनामा दिल्यानंतर नोटीस पिरेड म्हणून पुढील काही दिवस काम करावे लागते. हा नोटीस पिरेड काही ठिकाणी महिन्याभराचा, तीन महिन्याचा किंवा सहा महिने कालावधीचा असतो. मात्र राजीनामा दिल्यानंतर अनेकजण हा नोटीस पिरेड पूर्ण न करताच कंपनी सोडतात. परंतु आता हा नोटीस पिरेड पूर्ण न करताच नोकरी सोडल्यास कर्मचाऱ्यांना फटका बसू शकतो. कारण गुजरात अथॉरिटी ऑफ अ‍ॅडव्हान्स रुलिंगने नोटिस पिरेडचा कालावधी पूर्ण न करताच नोकरी सोडल्यास 18 टक्के जीएसटी आकारण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.     

प्रत्येक कंपनीत कामाचा राजीनामा दिल्यानंतर नोटीस पिरेड म्हणून ठराविक कालावधी नेमून दिलेला असतो. त्यामुळे काम सोडताना हा कालावधी कर्मचाऱ्याला पूर्ण करणे बंधनकारक असते. मात्र अनेकजण नोटीस पिरेड पूर्ण न करताच काम सोडण्याच्या तयारीत किंवा विचारात असतात. तर काहीजण राजीनामा देऊन हा नोटीस पिरेड पूर्ण न करताच निघून जातात. पण यापुढे राजीनामा दिल्यानंतर असणाऱ्या कंपनीच्या नियमांव्यतिरिक्त आता कर्मचाऱ्याला आर्थिक फटका देखील बसण्याची शक्यता आहे. कारण आता नोटिस पिरेड पूर्ण न करताच काम सोडल्यास 18 टक्के जीएसटी भरावी लागणार आहे. गुजरात अथॉरिटी ऑफ अ‍ॅडव्हान्स रुलिंगने हा निर्णय घेतला असून, नोटीस पिरेड पूर्ण न केल्यास संबंधित कर्मचाऱ्याला दंड भरावा लागणार आहे.  

गोवा ते हुबळी हवाई वाहतूक सेवा सुरु

याशिवाय, नोटीस पिरेडचा कालावधी कर्मचाऱ्याला पूर्ण करायचे नसल्यास त्याबदल्यात  नोटीस पिरेडच्या कालावधीतील वेतानाएवढे पैसे देखील द्यावे लागू शकतात. कर्मचारी अचानक नोटीस पिरेड पूर्ण न करताच निघून गेल्याने कंपनीला आर्थिक नुकसान सोसावे लागते. आणि म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे गुजरात अथॉरिटी ऑफ अ‍ॅडव्हान्स रुलिंगने म्हटले आहे.    

 

संबंधित बातम्या