गुजरात सरकारची मोठी घोषणा, सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केली वाढ

गुजरात (Gujarat) राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना बंपर भेट दिली आहे.
गुजरात सरकारची मोठी घोषणा, सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केली वाढ
MoneyDainik Gomantak

गुजरात राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना बंपर भेट दिली आहे. याअंतर्गत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. गुजरात राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 01 जुलै 2021 पासून वाढीव DA चा लाभ मिळेल. हा लाभ 7व्या वेतन आयोगांतर्गत उपलब्ध असणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये (Gujarat) या श्रेणीतील कर्मचारी आणि पेन्शनधारकांची संख्या तब्बल 9.38 लाख आहे. (Gujarat government has increased the dearness allowance of government employees by 3 Percent)

Money
कामात येऊ शकतो अडथळा, मे महिन्यात बँका 13 दिवस बंद

थकबाकी दोन हप्त्यांमध्ये दिली जाईल

सर्व कर्मचाऱ्यांची मागील 10 महिन्यांची थकबाकी दोन समान हप्त्यांमध्ये देण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. पहिल्या पाच महिन्यांच्या थकबाकीचा पहिला हप्ता मे 2022 च्या पगार आणि पेन्शनमध्ये जोडला जाईल. त्यानंतरच्या पाच महिन्यांच्या थकबाकीचा दुसरा हप्ता जून 2022 च्या पगारासह दिला जाईल. अशाप्रकारे मे महिन्यापासून लाभार्थी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे.

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी गुजरात दिनाच्या शुभेच्छा दिल्या

गुजरातच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा देताना राष्ट्रपती राम नाथ कोविंद (President Ram Nath Kovind) म्हणाले की, ''गुजरात दिनानिमित्त राज्यातील सर्व रहिवाशांना शुभेच्छा. महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांची भूमी विकासाच्या मापदंडावर देशातील आघाडीच्या राज्यांमध्ये आहे. इथल्या पुरोगामी लोकांनी आणि उद्योजकांनी गुजरातसह भारताची जगभरात खास ओळख निर्माण केली आहे. राज्याची अशीच प्रगती व्हावी हीच सदिच्छा.'' अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) म्हणाले की, ''गुजरात राज्याच्या स्थापना दिनानिमित्त गुजराती जनतेला माझ्याकडून शुभेच्छा. महात्मा गांधी, सरदार पटेल आणि इतर अनेक महान लोकांच्या आदर्शांनी प्रेरित होऊन, गुजरातमधील लोक त्यांच्या वैविध्यपूर्ण कामगिरीसाठी सर्वत्र कौतुक करतात.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.