HDFC क्रेड‍िट कार्ड धारकांचे बल्ले-बल्ले, 'या' प्लॅनचा होणार जबरदस्त फायदा

HDFC Bank Credit Card: जर तुमच्याकडे HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड असेल किंवा तुमचे HDFC बँकेत खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर आहे.
HDFC
HDFCDainik Gomantak

HDFC Bank Credit Card: जर तुमच्याकडे HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड असेल किंवा तुमचे HDFC बँकेत खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. होय, बँकेने तयार केलेल्या नवीन योजनेचा थेट फायदा करोडो बँक ग्राहकांना होणार आहे. देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक दर महिन्याला 10 लाख क्रेडिट कार्ड जारी करण्याची योजना आखत आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बँकेने उचललेल्या पावलांचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे.

नवीन ऑफर सादर केल्या जातील

बँकेचे कन्ट्री हेड पराग राव यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीत, बँकेला क्रेडिट कार्ड इश्यूची सध्याची संख्या 10 लाखांपर्यंत वाढवायची आहे. आता ही संख्या 5 लाख आहे, ती येत्या काही दिवसांत दुप्पट करण्याचे नियोजन आहे. राव यांनी असेही सांगितले की, हे लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि क्रेडिट कार्डवरील (Credit Card) खर्च वाढवण्यासाठी, ऑनलाइन रिटेलपासून ते अन्न वितरणापर्यंत अनेक उद्योगांशी भागीदारी जाहीर केली जाईल.

HDFC
SBI, HDFC अन् ICICI बँकेच्या ग्राहकांचे बल्ले-बल्ले, RBI केली मोठी घोषणा

स्पर्धक बँकांच्या व्यवसायात पुढे

म्हणजेच, या करारांतर्गत उपलब्ध असलेल्या योजनांचा थेट लाभ ग्राहकांना (Customers) मिळणार आहे. ब्लूमबर्गने जारी केलेल्या अहवालात असे म्हटले की, ऑगस्टमध्ये कार्डवरील बंदी हटवल्यानंतर झपाट्याने सुधारणा झाली आहे. वास्तविक, ग्राहकांना त्रास देणाऱ्या ऑनलाइन गडबडीमुळे HDFC ला शिक्षा झाली होती. आरबीआयने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये कार्डवरील एकूण खर्चापैकी एचडीएफसीचा वाटा 29 टक्के होता. हे इतर प्रतिस्पर्धी बँकांच्या तुलनेत खूप जास्त आहे.

HDFC
HDFC बँकेने 15 दिवसांत दिली दुसरी मोठी बातमी! ग्राहकांचे बल्ले-बल्ले

राव यांच्या वतीने असेही सांगण्यात आले की, बँकेचे लक्ष केवळ नवीन कार्ड देण्यावर नाही, तर ग्राहकांच्या कार्डने अधिकाधिक खरेदीही केली जाईल. यासाठी ग्राहकांना नवीन ऑफर्स देण्यात येणार आहेत. याचा फायदा करोडो ग्राहकांना होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com