स्वस्तात Apple iPhone 14 खरेदी करण्याची संधी, प्री-ऑर्डरवर बंपर सवलत

iPhone 14 आणि iPhone 14 Pro प्री-ऑर्डर केल्यावर HDFC ऑफरचा फायदा घेता येईल.
स्वस्तात Apple iPhone 14 खरेदी करण्याची संधी, प्री-ऑर्डरवर बंपर सवलत

देशात Apple iPhone हवा असलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुम्हालाही आयफोन विकत घ्यायचा असेल तर आयफोनची नवीन सीरीज 14 मॉडेल्स स्वस्त दरात तुम्ही घेऊ शकता. HDFC बँक iPhone 14 सीरीजच्या स्मार्टफोन्सवर बंपर ऑफर देत आहे.

कॅलिफोर्नियातील मुख्यालयात 7 सप्टेंबर रोजी Apple च्या मेगा इव्हेंटमध्ये नवीन जनरेशन iPhone 14 सीरीज लॉन्च करण्यात आली. Apple ने iPhone 14 सीरीज सोबत Smart Watch Series 8, iPad आणि AirPods Pro 2 देखील लाँच केले आहेत. अॅपलचे उत्पादन लाँच झाल्यापासून, ग्राहक लवकरात लवकर ते खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत.

सिनेरसिकांसाठी पर्वणी असणाऱ्या 'IFFI' साठीची नोंदणी सुरु

Apple ने दिलेल्या माहितीनुसार, 9 सप्टेंबरपासून iPhone 14 सीरीजचे बुकिंग सुरू झाले आहे. तर, हे स्मार्टफोन 16 सप्टेंबरपासून लोकांच्या हातात येण्यास सुरुवात होईल. HDFC ने iPhone सीरीजच्या दोन स्मार्टफोन्सवर ग्राहकांना उत्तम ऑफर देण्याची घोषणा केली आहे. ऑफरनुसार, ग्राहक परवडणाऱ्या किमतीत iPhone 14 (Apple iPhone 14) आणि iPhone 14 Pro (Apple iPhone 14 Pro) खरेदी करू शकतात.

असा घेता येईल HDFC ऑफरचा फायदा

iPhone 14 आणि iPhone 14 Pro प्री-ऑर्डर केल्यावर HDFC ऑफरचा फायदा घेता येईल. प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना HDFC क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर थेट 6,000 रुपयांची सूट मिळेल. HDFC त्वरित कॅशबॅक सुविधा देत आहे. ही ऑफर 54,900 रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या अॅपलच्या कोणत्याही उत्पादनावर लागू होईल.

Apple च्या नवीन जनरेशन iPhone 14 सीरीज स्मार्टफोन iPhone 14 ची भारतात मूळ किंमत 79,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर, iPhone 14 Pro 1,29,900 रुपयांना खरेदी करता येईल. HDFC च्या ऑफरचा वापर केल्यावर, दोन्ही स्मार्टफोनच्या किमतीत त्वरित कॅशबॅकच्या रूपात 6,000 रुपयांची सूट मिळेल.

स्वस्तात Apple iPhone 14 खरेदी करण्याची संधी, प्री-ऑर्डरवर बंपर सवलत
Sharad Pawar NCP: 'राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारच', अध्यक्षपदी फेरनिवड

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com