एफडीवरही मिळणार मोठे व्याज, या बँका देत आहेत जबरदस्त 'स्कीम'

FD का करावी?
Hefty interest will also be available on FD

Hefty interest will also be available on FD

Dainik Gomantak

सध्याच्या कमी व्याजदर आणि उच्च चलनवाढीच्या परिस्थितीत सामान्य बँकेच्या मुदत ठेवी मध्ये पैसे ठेवणे फारसे महत्त्वाचे मानले जाऊ शकत नाही परंतु तरीही गुंतवणूकदारांसाठी सुरक्षितता ही एकमेव काळजी असेल तर तो सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे. मुदत ठेवी हा विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि इतरांसाठी जोखीम टाळून गुंतवणूक करण्याचा एक चांगला पर्याय आहे.

त्याच वेळी, आता महामारीनंतर, अनेक बँकांनी (Banks) ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना सुरू केल्या आहेत, ज्या 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना सध्याच्या व्याजदरापेक्षा जास्त व्याज देतात. त्यामुळे जर तुम्हीही ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या कुटुंबात ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांच्यासाठी तुम्हाला FD करायची आहे, तर आज आम्‍ही तुम्‍हाला पाच स्मॉल फायनान्‍स बँका आणि खाजगी बँकांबद्दल सांगणार आहोत जे ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर सर्वोत्तम व्याजदर देतात.

<div class="paragraphs"><p>Hefty interest will also be available on FD</p></div>
करोडपती बनायचे असेल तर जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे

FD वर जास्त व्याज देणार्‍या बँका

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक: ही बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर 7.25 टक्के व्याजदर देत आहे. यानुसार 1 लाख रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांत वाढून 1.24 लाख रुपये होईल.

येस बँक: ही बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर 7 टक्के व्याज देत आहे. यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांत वाढून 1.23 लाख रुपये होईल.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक: बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर 7.30 टक्के व्याज देत आहे. यानुसार 1 लाख रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांत वाढून 1.24 लाख रुपये होईल.

एयू स्मॉल फायनान्स बँक: ही बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या FD वर 6.75 टक्के व्याज देत आहे. यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांत वाढून 1.22 लाख रुपये होईल.

RBL बँक: ही बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या FD वर 6.80 टक्के व्याज देत आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास तीन वर्षांत 1 लाख रुपयांची गुंतवणूक 1.22 लाख रुपयांपर्यंत वाढेल.

FD का करावी?

जर तुम्हाला सुरक्षितपणे गुंतवणूक करायची असेल तर FD सर्वोत्तम आहे. यामध्ये तुम्हाला रिटर्नची चिंता करण्याची गरज नाही. तुमचा परतावा पूर्वनिश्चित आहे. FD पूर्ण केल्यावर तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत हे तुम्हाला माहीत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com