एकदा चार्ज करा आणि पळा २१० किमी; हिरोने लॉन्च केली भन्नाट इलेक्ट्रिक स्कूटर

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

हिरो इलेक्ट्रिकने व्यावसायिक वापरासाठी इलेक्ट्रिक स्कूटर्सची नवी श्रेणी सुरू केली आहे. त्यामध्ये छोट्या-मोठ्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी या स्कूटरचा उपयोग केला जाऊ शकतो. तसेच या गाड्यांना इंधनाचा अतिरिक्त खर्चही नसणार आहे.

नवी दिल्ली-  हिरो इलेक्ट्रिकने भारतात  हिरो Electric Nyx-HX स्कूटर लाँच केली आहे. ही स्कूटर एकदा चार्जिंग केल्यानंतर तब्बल 210 किलोमीटरपर्यंतचे अंतर गाठू शकते, असा कंपनीचा दावा आहे. हिरो Nyx-HX इलेक्ट्रिक सीरिजच्या स्कूटरची किंमत 64 हजार 640 रुपयांपासून सुरू होते. महिंद्राने स्कूटरचे अनेक व्हेरिएंट लाँच केले असून त्यातील टॉप व्हेरिएंटची किंमत 1 लाख 9 हजार 440 रुपये आहे.

व्यावसायिक वापरासाठी चांगली गाडी-

हिरो इलेक्ट्रिकने व्यावसायिक वापरासाठी इलेक्ट्रिक स्कूटर्सची नवी श्रेणी सुरू केली आहे. त्यामध्ये छोट्या-मोठ्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी या स्कूटरचा उपयोग केला जाऊ शकतो. तसेच या गाड्यांना इंधनाचा अतिरिक्त खर्चही नसणार आहे. तसेच ही गाडी इकोफ्रेंडलीही असणार आहे. ही हिरो इलेक्ट्रिक स्कूटर 210 किलोमीटरच्या मायलेजसह टॉप व्हेरिएंट आहे. यापुर्वीच्या व्हेरिएंटची क्षमता एकदा चार्जिंग केल्यानंतर ती 72 किलोमीटर धावू शकत होती.  

आवश्यकतेनुसार कस्टमायझेशन शक्य-

हिरो इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या या नव्या मालिकेचा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार कस्टमाइज करू शकता. या सीरिजच्या स्कूटरची रनिंग प्राइज खूपच कमी आहे. तसेच तुम्ही थोडेफार जड सामानही या गाडीवरून सहजपणे वाहून नेऊ शकता. हिरो इलेक्ट्रिक स्कूटरमध्येही स्मार्ट कनेक्टिव्हिटी आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून त्यावर नियंत्रणही ठेवू शकता.

 

संबंधित बातम्या