Hero आणि Zero आता एकत्र करणार काम! 'या' कामासाठी केली हातमिळवणी

सप्टेंबरमध्ये 60 मिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीला मान्यता
Hero Motocorp | Zero Motorcycles
Hero Motocorp | Zero Motorcycles Dainik Gomantak

Hero MotoCorp and Zero Motorcycles: भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) सप्टेंबर 2022 मध्ये कॅलिफोर्नियातील झीरो मोटरसायकलमध्ये USD 60 दशलक्ष गुंतवणुकीस मान्यता दिली. झिरो मोटरसायकल ही इलेक्ट्रिक बाइक्सच्या जबरदस्त रेंजसाठी जगभरात ओळखली जाते.

हीरो मोटोकॉर्पने सांगितले आहे की, कंपनीने प्रीमियम इलेक्ट्रिक मोटरसायकलसाठी क्षेत्रातील सहयोगासाठी अमेरिकन कंपनी Zero Motorcycles सोबत करार केला आहे. हिरो मोटोकॉर्प आता झिरो मोटरसायकलच्या सहकार्याने प्रीमियम इलेक्ट्रिक बाइक्स तयार करणार आहे.

झिरो मोटरसायकल ही कॅलिफोर्निया स्थित इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी आहे. झीरो कंपनी दीर्घकाळापासून इलेक्ट्रिक टू-व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात काम करत आहे.

Hero Motocorp | Zero Motorcycles
Post Office Scheme: पोस्टाची 'ही' योजना फक्त तुमच्यासाठी, सरकार देतेय आकर्षक परतावा!

सप्टेंबर 2022 मध्ये, Hero MotoCorp ने झीरो मोटरसायकलमध्ये USD 60 दशलक गुंतवणुकीला मान्यता दिली होती. झीरो इलेक्ट्रिक मोटरसायकल आणि पॉवरट्रेनच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे.

Hero MotoCorp चे अध्यक्ष आणि CEO पवन मुंजाल म्हणाले, "आम्ही भारतात आणि जागतिक बाजारपेठेत इलेक्ट्रिक मोबिलिटीला गती देण्यासाठी उत्सुक आहोत." तर झीरो मोटरसायकलचे सीईओ सॅम पाश्चल म्हणाले की, "दोन्ही कंपन्या रायडिंगचा अनुभव आणि नवीन उत्पादने जगभरात बाजारात आणण्यासाठी वचनबद्ध आहेत."

झीरो मोटरसायकलची स्थापना 2006 मध्ये नासाचे माजी अभियंता नील साईकी यांनी केली होती. सध्या झीरो एस आणि एसआर स्ट्रीट बाइक्स, एफएक्सएस सुपरमोटो, डीएस आणि डीएसआर ड्युअल-स्पोर्ट बाइक्स, एसआर/एफ आणि एफएक्स नावाच्या मोटोक्रॉस बाइक्ससह इलेक्ट्रिक बाइक्सच्या विस्तृत श्रेणीचे उत्पादन करते.

Hero MotoCorp ने अलीकडेच विडा ब्रँड अंतर्गत पहिले इलेक्ट्रिक वाहन म्हणून पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केले. नवीन करारांतर्गत, झिरो मोटरसायकल इलेक्ट्रिक पॉवरट्रेन विकसित करेल आणि Hero MotoCorp च्या उत्पादन, सोर्सिंग आणि विपणनाचा लाभ घेईल.

Hero Motocorp | Zero Motorcycles
PM Kisan चा 13 वा हप्ता आला नाही, तर या नंबरवर लगेच कॉल करा!

हिरो मोटोकॉर्प इलेक्ट्रिक वाहने आणि पायाभूत सुविधांबाबत खूप जागरूक दिसते. अलीकडेच कंपनीने बेंगळुरू, दिल्ली आणि जयपूर येथे सार्वजनिक चार्जिंग पायाभूत सुविधा कार्यान्वित करण्यास सुरुवात केली आहे, कंपनीने सार्वजनिक वापरासाठी तीन शहरांमध्ये सुमारे 300 चार्जिंग पॉइंट स्थापित केले आहेत.

आता या नवीन करारामुळे Hero MotoCorp उत्तम आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज इलेक्ट्रिक वाहने तयार करेल, ज्यांची भारतीय बाजारपेठेबरोबरच जागतिक बाजारपेठेत विक्री केली जाईल.

भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधील इतर ब्रँड्समध्ये Ather, Ola, Hero Electric, Bajaj, TVS, Okinawa, Pure EV आणि Revolt यांचा समावेश आहे, 2030 पर्यंत भारतात इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीचे प्रमाण 22 दशलक्ष युनिट्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

येत्या काळात येथील बाजारपेठेत इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणाऱ्यांसाठी अनेक चांगले पर्याय उपलब्ध असतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com