Hero Electric Scooter: प्रतीक्षा संपली! हिरोची इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच होणार लॉन्च

Hero Electric Scooter: प्रतीक्षा संपली! हिरोची इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच  होणार लॉन्च

दुचाकीच्या मार्केटवर अधिराज्य गाजवणारी हिरो मोटोकॉर्प्स इलेक्ट्रिक (Hero Motocorp ) दुचाकी कधी बाजारात घेऊन येणार याची उत्सुकता अनेकांनी लागली होती. अखेर हिरो कंपनीच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून, हिरो कंपनी त्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच लॉन्च करणार आहे. हिरो विडा ई-स्कूटर ही आपली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात घेऊन येत आहे. हिरोच्या सब-ब्रँड विडा अंतर्गत ही स्कूटी लॉन्च केली जाईल.

एथर आणि ओला इलेक्ट्रिकपेक्षा विडा ई-स्कूटर अधिक कार्यक्षम असू शकते. गाडीचा परफॉर्मन्स, सुरक्षा, रेंज आणि टिकाऊपणा यासारख्या मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार विडा ई-स्कूटर 7 ऑक्टोबर रोजी पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे.

Hero Electric Scooter: प्रतीक्षा संपली! हिरोची इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच  होणार लॉन्च
Vishwajit Rane: मोरजी किनारी बेकायदेशीर वृक्षतोड; कासवही झाले 'बेघर'

कंपनीमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात नव्या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल काहीही माहिती उघड करण्यात आलेले नाही. मागील वर्षी ऑगस्टमध्ये कंपनीच्या 10 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून Hero MotoCorp च्या इलेक्ट्रिक स्कूटरचा एक प्रोटोटाइप आभासी पद्धतीने दाखवण्यात आला होता.

हिरोची विडा ई-स्कूटर आधी मार्चमध्ये लॉन्च केली जाणार होती पण नंतर तीचे लॉन्चिंग लांबणीवर पडले. कंपनीने सुरूवातील लॉन्चिंगसाठी 1 जुलै निश्चित केली होती मात्र, आता 7 ऑक्टोबरला अखेर ही स्कूटर लॉन्च केली जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com