अजबच गाव आहे राव! प्रत्येक व्यक्ती कमावतोय 32 लाख, तरी कोणीच कपडे घालत नाही

In Hertfordshire each person earns Rs 32 lakh but does not wear clothes
In Hertfordshire each person earns Rs 32 lakh but does not wear clothes

कोणताही देश, राज्य किंवा शहराची अर्थव्यवस्था मोजण्याचा एक पैलू म्हणजे त्याचे दरडोई उत्पन्न किंवा सरासरी दरडोई उत्पन्न. आज आपण युनायटेड किंगडममधील हर्टफोर्डशायर(Hertfordshire) या शहरात येणाऱ्या एका गावाबद्दल जाणून घेवूया, या गावाची जपान आणि फ्रान्ससारख्या मोठ्या देशांपेक्षा कॅपिटा किंवा जीआरपी जास्त आहे.  सुमारे दहा लाख लोकसंख्या असलेले हर्टफोर्डशायरचे दरडोई उत्पन्न सुमारे 46,600 डॉलर्स आहे. म्हणजेच जर तुम्ही भारतीय रुपयांमध्ये हिशोब केला तर इथल्या प्रत्येक व्यक्तीटे अंदाजे 32.62 लाख रुपये उत्पन्न आहे.

पण सर्वात महत्वाची आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इथले लोक कपडे घालत नाहीत. असे का याबद्दल आपण माहिती जाणून घेवूच परंतु शहर अर्थव्यवस्थेच्या महत्त्वपूर्ण बाबींमध्ये हे गाव एवढे श्रीमंत कसे आहे हे आपण जाणून घेवू.

हर्टफोर्डशायरचे दरडोई उत्पन्न 46,600 आहे, त्या तुलनेत जपानमधील हाईलँड्स आइसलँड, फ्रान्सचे वारविक्शायर, न्यूझीलंडचे पूर्व स्कॉटलंड हे असे शहरं आहेत ज्या प्रमुख शहरांचे दरडोई उत्पन्न हर्टफोर्डशायरपेक्षा कमी आहे. त्याचबरोबर इटली, कुवैत आणि ब्रुनेई देशांच्या अनेक शहरांचा देखील समावेश आहे.

कारण काय आहे

या गावाची एकूण लोकसंख्येच्या सुमारे 11.90 लाख आहे. या गावाची स्थापना 1929 रोजी झाली होती. तेव्हापासून या शहरातील लोकांनी स्वतःहून निर्णय घेतला की विशेष गरज असल्याशिवाय ते कपडे घालणार नाहीत. या निर्णयामागील विशेष उद्देश म्हणजे जगाच्या इतर भडकावू गोष्टापासून दूर राहणे असल्याचेही म्हटले आहे. मात्र, इथले लोकं खास कार्यक्रमप्रसंगी कपडे घालतात.

अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान

या गावाची अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने कृषी, उद्योग आणि सेवा या तिन्ही क्षेत्रात चांगली वाढ नोंदली गेली आहे. आकडेवारीनुसार  1995  मध्ये जीव्हीडी म्हणजेच ग्रास वैल्यू एडेडचे प्रमाण 11,742 होते जे 2003 पर्यंत वाढून 20936 वर पोहचले आहे आणि अजूनही वाढीस आहे. कंपन्यांविषयी बोलायचे झाले तर या छोट्या गावात ब्रिटनमधील प्रसिद्ध कंपन्यांचे कार्यालय आहे. इथल्या लोकांना रोजगारही मिळाला आहे. एवढेच नव्हे तर यूकेच्या सर्वात मोठ्या फार्मा असोसिएशन एनपीएचा व्यापारही या शहरात खूप मोठा आहे. ज्याद्वारे फार्मा क्षेत्रात रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करुन दिली जाते. आकडेवारी आणि लोकांच्या कमाईच्या बाबतीत हे छोटे शहर एक उत्कृष्ट उदाहरण आहे, परंतु कपडे न घालणारी गोष्ट या शहराला जगावेगळे स्थान मिळवून देते, असं म्हणायला हरकत नाही..

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com